पत्रिकेत एकटा एखादा ग्रह व्यक्तीचे आयुष्य बदलू शकतो का ? याचे उत्तर काही खास परिस्थितीत हो असेच देता येईल. दशमस्थान हे व्यक्तीचे कर्मस्थान म्हणुन ओळखले जाते. या ठिकाणी रवि, मंगळ, गुरु किंवा शनि सारखा बलवान ग्रह स्वराशीत, उच्च राशीत असताह्या व्यक्तींना उच्च अधिकार प्राप्त होतो. एखादा ग्रह स्वराशीत/उच्च राशीत असून स्वनवमांशात किंवा उच्च नवमांशात असेल तर अजूनहीबलवान होतो. तोच ग्रह पत्रिकेत दशमभावारंभी असेल तर ही पत्रिका अजून विशेष प्रभावी होते.
सर्व ग्रहांच्या मधे बलवान रवि आहे. तो ग्रहांचा राजा समजला जातो पण तो ३६५ दिवस बलवान नसतो. दिवसभरात तो दुपारी माध्यानसमयाला बलवान असतो तर १४-१५-१६-१७ एप्रिल या दिवशी मेष राशीत आणि मेष नवमांशात विशेष बलवान असतो. ज्यांचा जन्म या तारखांना आहे त्यातुन दुपारी १२ च्या दरम्यान आहे त्यांना नोकरी-व्यवसायात विशेष अधिकार मिळतो. त्यांची नोकरीत प्रगती वेगाने होते.
आपल्या ओळखीचे लोक शोधा ज्यांची जन्मतारीख १४-१५-१६ किंवा १७ एप्रिल आहे. आपल्याला त्यांची नोकरी/व्यवसायातली प्रगती पाहून पटेल की खरच किमान या बाबतीत हे लोक भाग्य घेऊन जन्माला आलेले आहेत. या महिन्यात त्यांचे अभिनंदन.
शनि धनु राशीत १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ काळात वक्री होणार आहे. ज्यांची रास धनु आहे, खास करुन पुर्वाषाढा नक्षत्र १ चरण आहे किंवा मुळ नक्षत्र ४ व ३ चरण आहे त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास देणारा हा सर्वात कठीण काळ असेल. अर्थात शनि उपासनेने हा त्रास कमी होतो यास्तव खालील नवग्रहपीडाहर स्त्रोत्रामधला हा श्लोक दररोज २१ वेळा जपावा. शनिवारी संध्याकाळी शनि दर्शन घ्यावे.
माझे ही मुळ नक्षत्र ३ रे चरण आहे. मी ही हा त्रास पुन्हा एकदा आयुष्यात दुसर्या वेळेला अनुभवणार आहे. शनिमहाराज मला सोडणार नाहीत. त्यांनी सदवर्तनी गुरु महाराजांना अडिच घटका त्रास दिला. मी तर सामान्य माणूस.
सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।
आता १४ एप्रिल ते १३ मे मेष महिन्याचे भविष्य पाहू. हे राशीभविष्य जसे चंद्र राशीकडुन पहावे तसे लग्नराशी कडुन सुध्दा पहावे.
मेष रास : आपल्या राशीत सध्या हर्षलचे भ्रमण असताना त्यावरुन रविचे भ्रमण ही स्थिती खासच डोक्याला त्रास देणारी असेल. डोक्यावर बर्फ़ ठेवणे हे प्रत्यक्ष करणे शक्य नसले तरी किमान १८ एप्रिल ला डोके शांत ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबस्थानी १९ एप्रिलला येणारा शुक्र घरात शांतता ठेवेल. मंगळ २ मे नंतर मकर राशीत येणार आहे. त्यानंतर मात्र युध्दजन्य परिस्थितीने असेल पण तो पर्यंत डोक्यात विचार ठेवा पण डोके गरम होऊ देऊ नका. हेच तुमच्या हिताचे आहे.
वृषभ रास : राशीचा मालक शुक्र महिनाभर आपल्या राशीत असणार आहे. ही उत्तम स्थिती असली तरी फ़ारशी सुखाची नाही. असेही वृषभ राशीचे लोक कष्टाला घाबरत नाहीत. आरोग्याच्या तक्रारी, खर्च यामुळे महिनाभर आपली झोप उडणार आहे हे निश्चित. २ मे नंतर आरोग्याचा तक्रारीला आराम पडेल. नोकरी- व्यवसायाचा मालक शनि अशुभ स्थानी वक्री होणार असल्याने ही एक चिंता अजून लागून राहील असे काहीसे ग्रहमान या महिन्यात आहे.
मिथुन रास: आपल्या राशीचा स्वामी कर्म स्थानातून लाभ स्थानात ९ मे ला जाणार आहे. मागील महिनाभर जी काही कामे केली असतील त्याचे फ़ळ मिळेल अशी स्थिती ९ मे नंतर येईल. त्याच्या आधीच खर्चाची तयारी आहे कारण या महिन्यात आपण प्लेजर टुर करणार आहात. थंड हवेच्या ठिकाणी जाणार म्हणजे खर्च होणारच. पाहूया तुमच्या जोडीदाराचा राग निवळतोय का ? मागच्या किंवा या महिन्यात असे काही झाले तर ही एक संधी आहे.
कर्क रास : आपल्या संततीच्या काळजीत असाल तर २ मे नंतर यावर दिलासा मिळेल. तुमच्या दशमातून रविचे भ्रमण आहे. तुमची जन्मतारीख जर १४-१५-१६ किंवा १७ एप्रिल असेल तर प्रमोशन/अधिकारात वाढ खात्रीने दिसेल. वाढदिवस नसेल तरी इतरांना या महिन्यात नोकरीत काही विशेष अधिकार प्राप्त होतील. लाभ स्थानी महिनाभर शुक्र आहे. तो व्यापारी वर्गाला भरपूर आवक देणार आहे. सर्व आर्थिक चिंता मिटतील असे ग्रहमान आहे.
सिंह रास : तुमच्या राशीचा मालक बरेच महिन्यांनी बलवान होतो आहे. मागील काही महिने आपली गळचेपी झालेली असेल तर भरपाई होईल. एक डरकाळी मात्र अवश्य द्या. दशमात येणार शुक्र तुम्हाला सहजतेने कार्यात यश देणार आहे. या महिन्यात जर तुमचा सी आर भरला जाणार असेल तर तो चांगलाच असेल जेणेकरुन तुमचा अधिकार जेंव्हा केंव्हा प्रमोशन होईल तेंव्हा वाढेल. घरगुती फ़्रंट वर काही चिंता असतील पण तुम्ही लक्ष देऊच नका.
कन्या रास : ९ मे पर्यंत तुमचे गुण, तुमचा अभ्यास आणि तुमचे विश्लेषण याची चर्चा व्हावी असे योग आहेत. होणार नसेल तर ती तुम्ही घडवा. थोडा आत्मविश्वास दाखवा आणि बोलणार्याची माती विकली जाते हे सत्य असेल तर तुमची बुध्दीमत्ता हे तर १०० नंबरी सोने आहे. तुम्ही घोडे दामटा. त्या शिवाय यश नाही. भाग्यात जाणारा शुक्र तुम्हाला यश देणारच आहे. ९ मे पर्यंत एकही संधी सोडु नका आणि कच ही खाऊन नका.
तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी जवळ जवळ महिनाभर अशुभ स्थानी असणार आहे. ह्या स्थानी असलेला राशी स्वामी सहज यश देत नाही. कोणतेही काम आपले सहज पुर्ण होणार नाही. चांगले प्लॅनिंग करुन प्रयत्न करावे लागतील. आपला भाग्येश व व्ययेश सप्तम स्थानी जाणार आहे. याचा अर्थ आपले भाग्य व्यापारातुन, खास करुन परदेशी वस्तु, परदेशी व्यक्ती या माध्यमातून उघडण्याचे संकेत आहेत. नाराज राशीस्वामी असताना प्रत्येक सौदा नीट तपासून घ्या.
वृश्चिक रास : घरगुती कलह मिटवताना आपल्याला बराच काळ द्यावा लागेल. आपण मोजके आणि जिव्हारी लागेल असे बोलता असा लौकीक आहे. शक्य असेल तर जरा राग गिळा. तुम्हाला खास आपले वाटणारे मित्र किंवा सासुरवाडीचे लोक सध्या कुणाच्या संगतीत काय खिचडी पकवत आहेत त्याकडे फ़क्त लक्ष द्या. ९ मे नंतर हे तुमच्या विरुध्द उघड बोलणार आहेत. अश्यावेळी तुमच्या हातात नेमकी बातमी हवीच.
धनु रास : तुमच्या राशीतून होणारे मंगळाचे भ्रमण आणि त्याचा २५ एप्रिल ला होणारा प्लुटो बरोबरचा सहयोग जरा उद्वीग्नता देणारा असेल. साडेसातीच्या पार्श्वभुमीवर मंगळाचे हे पुर्वाषाढा नक्षत्रातले भ्रमण ज्यांचे नक्षत्र पुर्वाषाढा आहे त्यांना १४ ते १८ तारखांपर्यंत मातेसोबत वाद विवादातून पीडा देईल. माताच काय पण मातेसमान सर्व व्यक्तिंचे गैरसमज यातून उद्वीग्नता येईल.
आपण काय करणार. वाद टाळणे इतकेच आपल्या हातात असते. शिक्षण क्षेत्रात काही अपेक्षीत संधी आपल्यासाठी वाट पहात आहेत.
मकर रास : मंगळाच्या भ्रमणाचा त्रास मकर राशीच्या लोकांना खर्चाच्या मुळे जाणवत असेल. अजून काही दिवस म्हणजे २ मे पर्यंत तो आहे. रविचे भ्रमण चतुर्थ स्थानातुन होताना तुमची झोप हा पापग्रह उडवेल. बुध भाग्यकारक संवाद घडवेल असे असताना मनातून हे फ़ार पुर्वीच व्हायला हवे होते असे जाणवेल. पंचमातून होणारे शुक्राचे भ्रमण मुलांच्या खास करुन मुलीच्या प्रगतीने तुम्हाला सुख देणारे असेल.
कुंभ रास : मला सातत्याने इतरांची सेवा करावी लागते अशी आपली तक्रार असते. वृषभ राशीतुन होणारे शुक्राचे भ्रमण महिनाभर सुखावणारे असेल. आपण महिला असाल तर एकतर माहेरी जाल किंवा ज्यांची सेवा तुम्हाला करावी लागते असे लोक घरात असणार नाहीत. क्वचीत असा योग येतो. या महिन्यात घरात तुमच्या मर्जीची सुख देणारी वस्तू जसे पंखा, कुलर, एअर कंडिशनर किंवा यासारखी वस्तू खरेदी करण्याचे व सुख उपभोगण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे.
मीन रास : दशमातून होणारे मंगळाचे भ्रमण आपल्याला २ मे पर्यंत दमविणार आहे. शारिरीक आणि मानसीक श्रम तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच मानवतात पण हा परिक्षेचा काळ या महिन्यात संपुन त्यापासून काही चांगल्या गोष्टी, नविन संधी मात्र निर्माण होताना दिसतील. उत्पन्नाचे स्त्रोत ही वाढतील. काही अनुभव लेखन घडावे असे वाटत असेल तर चांगली संधी आहे. या कष्टातुन निर्माण झालेल्या श्रमावर एक चांगला उपाय असेल.
ज्योतिष शिकायचे आहे तर आधी पंचांग शिकायला हवे.
http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page.html पंचांग शिकूया - भाग १
http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_24.html पंचांग शिकूया - भाग २
आपला आग्रह असेल तर ढोबळ कुंडली कशी मांडायची, स्पष्ट ग्रह, दशा अंतर्दशा या बाबत लिखाण मला करायला नक्की आवडेल.

No comments:
Post a Comment