Sunday, March 29, 2020

एप्रिल मे २०२० मधे कोरोना पेशंट वाढतील हे खोटे संशोधन आणि शनि मंगळ तसेच चंद्र राहू युती

काल एक बातमी आली की जॉन हाफकिन्स इंस्टिट्युट ने केलेल्या संशोधनात भारतात एप्रिल व मे २०२० मधे कोरोनाचा फैलाव वाढेल. २५ लाख लोक कोरोनाग्रस्त होतील आणि ऑगस्ट २०२० ला कोरोना संपेल. ही ता बातमी पहावी पण घाबरून जाऊ नये.


मी केलेल्या भाकिताच्या किंवा भारतात अनेकांनी केलेल्या कोरोना विषयावर भाकिताच्या एकदम विरूध्द असल्यामुळे मी या बातमीचा सोर्स शोधू लागलो.

मी नक्षत्रप्रकाश या फ़ेसबुक समुहावर ९ एप्रिल २०२० पासून कोरोना रोगी कमी कमी होत जातील आणि २४ एप्रिल २०२० नंतर कोरोना प्रसाराचा धोका संपेल असे भविष्य १४ मार्च २०२० ला प्रसिध्द केलेले आहे.

इंटरनेट वर शोध घेतल्यानंतर या बातमीला दुजोरा अनेक दुरदर्शन चॅनल्स ने दिलेला नाही. याचे कारण याची कारणे सांगणारा authentic अहवाल मिळालेला नाही.

किंबहुना जॉन हाफकिन्स युनिव्हसीटीने हे संशोधन केल्याचा इन्कार करून आमचा लोगो कुणीतरी कॉपी करून ही बातमी दिल्याचे ऑफ़िशीयल ट्विटर वरून खुलासा केलाय.


हे कमी की काय म्हणून ३१ मार्च २०२० ला होणाऱ्या शनि मंगळ युती व चंद्र राहू युतीमुळे मुंबई व पश्चिम महाराष्ट्र मधे कोरोना वाढेल असे भाकित एका ज्योतिषी महोदयांनी केलेले आहे.

यावर मला असे वाटते की भारताच्या सहाव्या स्थानी राहू आहे. सहावे स्थान रोगस्थान आहे. चंद्र हा लोकभावनांचा कारक आहे. यामुळे या भविष्यामुळे लोक घाबरून जाण्या पलीकडे काही होणार नाही.

पण यामुळे नुकसान होणार नाही. कोरोना केसेस वाढण्याचा धोका नाही. कारण भारताच्या व्ययस्थानी असलेले मंगळ आता मकर राशीत आलाय आणि गुरूने तोपर्यंत राशी बदललेली असेल. भारताच्या व्ययस्थानी फक्त केतू आहे. यामुळे हॉस्पीटल हे व्ययस्थान दर्शविणार्या स्थानी ग्रहांची गर्दी नाही. व्ययेश व्ययात किंवा षष्ठेश व्ययात ही स्थिती नसल्यामुळे कोरोना रूग्ण वाढण्याचा वेग यात बदल अपेक्षित नाही.

मंगळ शनि युती तापदायक आहे हे खरे पण भारतासाठी मंगळ चतुर्थेश आणि लाभेश असून तो लग्नेशाच्या युतीत जाण्याने भारताला तरी किमान यापासून खुप मोठा किंवा गंभीर धोका नाही.

मला कोणत्याही ज्योतिष महोदयाशना कमी लेखायचे नाही. परंतु लोकहो, अश्या बातम्यांनी घाबरून जाऊ नका.

पण, घराच्या बाहेर सुध्दा तातडीचे काम असल्याखेरीज जाऊ नका. हे युध्द अशा संयमाने जिंकायचे आहे.

हा लेख नावासकट कॉपी पोस्ट करायला हरकत नाही.

© ज्योतिषशास्री नितीन जोगळेकर

No comments:

Post a Comment