Tuesday, April 18, 2017

संतती होण्यास अडचणी आहेत अश्यांसाठी

पंचम स्थानाच्या प्रश्न, त्यातुन संततीच्या संदर्भात म्हणजे जरा नाजुक मामला. दोघापैकी कोणाला मेडीकली काय दोष आहे हे विचारायला थोडीशी अडचण. फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत हे उत्तर पटकन येते पण काऊंट कमी आहे हे सांगणारे पुरुष थोडेच आहेत. याही पेक्षा वेगळी कारणे आहेत पण त्याची चर्चा करण्याचा हा लेख नाही.

एक दिवस ओळखीतुन एक फ़ोन आला की माझ्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत सहा वेळा IVF झाली पण गर्भ धारणा झाली नाही. भारतात IVF चा सक्सेस रेट ५५% आहे अशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि एका वेळेच्या IVF प्रयोगाची किंमत साधारण ३ ते ३.५ लाख आहे. पाच -सहा वेळा IVF फ़ेल झाली की जोडप्याचा धीर खचतो आणि कधीतरी पैसे हा ही प्रश्न असतोच.

ज्योतिषशास्त्र दृष्टीने पंचमेश सुस्थितीत म्हणजे पंचमात, लाभ स्थानी, भाग्य स्थानी किंवा दुसर्या स्थानी असला की संतती त्रासा शिवाय होणार असे सर्वसाधारण पणे म्हणता येते. पंचमेश गुरु असेल तर त्याचे नैसर्गीक कारकत्व संतती देण्याचे आहे त्यामुळे वरील विधान खात्रीलायक रित्या करता येते. हीच परिस्थीती पंचमेश गुरु शिवाय मंगळ, बुध, शुक्र , चंद्र किंवा रवि असता व तो वरील स्थानी असता ( २,५,९,११ ) असुन त्यावर जर भाग्येशाची पुर्ण दृष्टी असता तसेच खात्रीलायक विधान करता येते.

नवरा - बायको या दोघांच्याही कुंडलीत वरील स्थिती असताना ज्योतिषाकडे जाण्याचा प्रश्न संतती संदर्भात येत नाही.

याउलट पंचमेश ६,८ किंवा १२ स्थानी असता, किंवा शनि पंचमेश असुन ६,८ किंवा १२ स्थानी असता, भाग्येशाच्या पुर्ण दृष्टीमधे नसताना परिस्थिती वेगळी होते. संतती इच्छुक जोडपे लगेचच निदान करुन घेते. यातुन स्त्रीचे पंचमस्थान बिघडले असताना फ़ेलॊपीन ट्युब ब्लॉक या सारखा खर्चीक आणि वेळखाऊ तर PCOD या सारखे  पण डॉक्टरी उपायाने संतती प्राप्त होताना दिसते.

फ़ेलोपीन ट्युब ब्लॉक ही अत्यंत असाधारण परिस्थिती असताना आणि ४-५ वेळा IVF फ़ेल गेली असताना आता कधी IVF करु हा प्रश्न घेऊन जोडपे येते तेव्हा या जोडप्याला संतती सुख आहे ना ? हा प्रश्न आधी पहावा लागतो तर पुढचा प्रश्न जोडप्याचा मुळ प्रश्न नेमके कधी IVF करावे हा येतो.

नोव्हेंबर २०१६ मध्ये एक जोडप्याने मला प्रश्न विचारला आणि श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या कृपेने माझे मार्गदर्शन योग्य ठरुन कोणतेही यज्ञ -याग न सुचविता काही तारखा मी सुचवल्या,  ज्या दिवशी IVF केली असता सक्सेस्फ़ुल होईल असा अंदाज दिला.

आजच १८-०४-२०१७ रोजी  या जोडप्यातील पुरुष प्रत्यक्ष भेटला आणि त्याने IVF सक्सेसफ़ुल होऊन पत्नी प्रेग्नंट असल्याची गोड बातमी मला सांगीतली. सोबत आनंदाने जास्त दक्षिणाही देऊ केली. मी त्याला सांगीतले की तु एक मला लेखी देशील तर हा प्रयोग पुन्हा करण्याची मला संधी असे अडचणीतले लोक मला देतील. तो पुरुष विचारात पडलेला दिसला. कदाचीत ३ महिन्यापर्यंत ही बातमी जवळच्या नातेवाईकांना ही न सांगण्याची प्रथा असल्याने त्याने मला लेखी देण्याचे आश्वासन दिले नाही.
’
लेखी मागण्याचा उद्देश असा की जसा IVF हा प्रयोग आहे तसाच मी IVF सुयोग्य तारखा देणे हा सुध्दा प्रयोगच आहे. जर डॉक्टरने IVF यशस्वी होणार नाही असे सांगीतले असताना, माझ्या सल्याने जोडपे पुन्हा प्रयोग करत असेल तर मला जरा जास्त विचार करुन तारखा द्यायला हव्यात. किंबहुना त्या आधी पंचमेश पुजन/हवन या सारखे विधी करुनच मगच हा प्रयोग करायला हवा.

जितके मी जास्त प्रयोग करेन तितके हे तंत्र उत्तम रित्या विकसीत होऊन जोडपे कमीत कमी प्रयोगात यशस्वी कसे होईल याचे मार्गदर्शन करता येईल. या निमीत्ताने पहिल्याच खेपेला IVF फ़ेल झालेल्या जोडप्यांना ( IVF साठी उधार/ उसनावर असे पैसे जमा करावे न लागेल अश्या जोडप्यांना ) आवाहन की हे तंत्र विकसीत होण्यासाठी भेटा.

ज्योतिषाला अंधश्रध्दा म्हणुन हेटाळणी करणारे हे तंत्र विकसीत झाल्यावर IVF चा सक्सेस रेट ५५% वरुन जेव्हा अजुन वाढेल तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहे हे बहुदा मान्य करतील. आता IVF करणारे तज्ञ मात्र नाराज होतील. मला त्यांना इतकाच सांगायच आहे की तुमच्या शिवाय संतती होणे शक्य नाही. या प्रयोगात तुमची आवश्यकता नक्कीच आहे.  ज्योतिष नक्कीच तुमची आवश्यकता नाही असे म्हणण्याइतके कधीच प्रगत होऊ शकणार नाही. तुम्हालाही तुमचे तंत्र विकसीत करण्यासाठी यातुन नक्कीच इनपुटस मिळतील.

नितीन जोगळेकर
 फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन भेट हॊईल
संपर्का करीता -9763922176

भेट ठरल्यावर भेटीसाठी पत्ता

सज्जन प्लाझा बेसमेंट
हिंदुस्थान बेकरी समोर
चाफ़ेकर चौकाजवळ

चिंचवड पुणे - ४११०३३

Saturday, April 8, 2017

राशी भविष्य एप्रिल २०१७ करता व १४ एप्रिलला जन्म तारिख असणार्या सर्वांसाठी विशेष माहिती.

आज पर्यंत दर महिन्याला मी राशीभविष्य रवि बदलला की लिहीत होतो. एका पाक्षिकाने राशीभविष्य लिहीण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रस्तावना सोडता इंग्रजी महिन्याप्रमाणे तेच भविष्य प्रसिध्द करण्याचे आता मी ठरवले आहे. एप्रिल महिन्यात चंद्र सोडता तीन महत्वाचे ग्रह राशी बदल करत आहे. हर्षल ७ एप्रिलला पुढील सात वर्षांकरीता मेषेत येत आहे. हर्षल हा मंगळाचे मोठे स्वरुप असलेला पापग्रह आहे. भारतापेक्षा पाकिस्थान मध्ये याचे मोठे परिणाम दिसतील. मंगळ १२ एप्रीलला वृषभ राशीत जात आहे आणि १३ एप्रिलला रवि मेषेत जाईल. हर्षल मेषेत गेल्याने राशीवार काय घडेल हे मी नक्षत्रप्रकाश ह्या ज्योतिष विषयक लेखांच्या वासंतिक विशेषांकात लिहले आहे. त्याची ही लिंक. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html

ज्यांचा जन्म १४ एप्रिलचा आहे ते मोठेच भाग्यवान असतात. रवि त्यांच्या पत्रिकेत उच्चीचा व उच्च नवमांशात असल्याने यश, किर्ती किंवा अधिकार या व्यक्तीला मिळुन या व्यक्तीचा उत्कर्ष होत असतो. माझ्याकडे १४ एप्रिलला जन्म झालेल्या दोनशे व्यक्तींच्या पत्रिका आहेत ज्या जगभरात प्रसिध्द व्यक्ति म्हणुन नावारुपास आलेल्या आहेत. याचा अर्थ त्यांना आयुष्यभर प्रसिध्दी मिळते असे नाही. त्यांच्या पत्रिकेनुसार रवि महादशेची ६ वर्षे तर या व्यक्तीला बहुदा उत्तम असतात. आता राशीवार भविष्य पाहू.

मेष रास : ह्या व्यक्ती मुळात तापट त्यात गेले महिनाभर मंगळ या राशीत आहे. ७ एप्रिलला हर्षल मेषेत येत आहे आणि १४ तारखेपासुन रवी हा मेष राशीत आल्यामुळे जवळ्च्या व्यक्तींना यांच्या डोक्यावर थंड पाण्याची धार धरावी लागेल. अश्विनी नक्षत्र वाल्यांना याचा विशेष परिणाम दिसेल. मेषेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यांच्याकडे लक्ष द्यावे. १४ तारखेनंतर काही परिक्षा असतील तर नीट मार्गी लागतील. उष्णतेचे विकार वाढु नयेत म्हणुन विशेष काळजी घ्यावी.  

वृषभ रास : तुमचा राशीचा स्वामी महिनाभर लाभ स्थानी आहे. मीन रास शुक्राची उच्च रास आहे त्यामुळे मनात आणाल ते घडेल असे ग्रहमान आहे. फ़ायदा घ्या हे तुम्हाला सांगायला नको. आजवर अडुन राहीलेली कामे केवळ तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुर्ण होतील. नोकरीत स्थिती उत्तम राहील. मित्र मैत्रीणीच्या भेटी घडतील आणि सुवार्ता ही कानी पडतील.

मिथुन रास : तुमच्याही राशीचा अधिपती बुध मेषेत येत आहे. राशीचा अधिपती लाभात गेला की मनाप्रमाणे कामे होतात पण तुमच्या बाबतीत असे घडेलच असे नाही. कारण मेष ही बुधाची शत्रु रास आणि नीच रास आहे. कामे मार्गी लावण्यासाठी चांगले प्लॅनिंग व तुम्हाला खास शब्दांची योजना करुन काही कामे मार्गी लागतील.

कर्क रास : मेष रास तुमच्या दशम स्थानी येते. त्यात मंगळ आधीपासुन तेथे आहे ही युध्दजन्य परिस्थीती आहे. नोकरी/व्यवसायात प्रचंड कामे हातावेगळी करावी लागतील. घड्याळाकडे पहायची सोय नाही. ही परिस्थिती १२ एप्रिल पर्यंत आहे. त्यानंतर तुमच्या दशमस्थानी रवी येत आहे. महिन्याच्या उतरार्धात तुम्ही राजाप्रमाणे वागाल. तुमचा शब्द खाली पडणार नाही अशी स्थिती नोकरी/व्यवसायात १३ एप्रिल नंतर महिना अखेर असेल.

सिंह रास : १४ एप्रिल पर्यंत तुमच्या राशीचा अधिपती मीन राशीत अष्टमस्थानी असेल. ही स्थिती फ़ारशी उत्तम नव्हती. १४ एप्रिल पर्यंत किरकोळ शारिरीक तक्रारी पाठपुरावा करतील. १४ एप्रिलला रवि मेषेत गेला का हा त्रास संपेल. भाग्येश मंगळ भाग्यात १२ एप्रिल पर्यंत आहे ही चांगली स्थिती आहे. मंगळ वृषभ राशीत गेल्याने अनेक कामे मार्गी लागतील. तुम्हाला एखादा पुरस्कार मिळेल किमान चांगले शब्द तुमच्या बद्दल बोलले जातील असे योग या महिन्यात येतील.

कन्या रास : तुमच्या राशीचा स्वामी बुध महिनाभर मेष ह्या शत्रु राशीत आहे. काही काळ तो वक्री असल्यामुळे राश्याधीपती बलहीन आहे. शारिरीक आणि मानसीक शक्तीची कमतरता जाणवेल पण लग्नी गुरु असल्यामुळे विपरीत फ़ळे मिळणार नाहीत. सप्तमात भाग्येश शुक्र आहे. १५ तारखेनंतर व्यावसायीक असाल तर काही फ़ायद्याचे व्यावसायीक प्रस्ताव येतील. व्यावसायीक बाजूचा विचार करुन ते स्विकारण्यास हरकत नाही. व्यवसायात असलेला स्त्री वर्ग हे फ़ायद्याचे करार घडवण्यासाठी महत्वाचा भुमिका बजावतील.

तुळ रास : सातव्या स्थानी असलेला मेषेतला मंगळ विवाहीत असाल तर जोडीदाराचे मानसीक स्वास्थ्य बिघडवेल. ही स्थिती १२ एप्रिल पर्यंत रहाणार आहे यामुळे डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेऊनच जोडीदाराशी बोलावे तरच सुसंवाद होईल. आईच्या घरचे लोक ( मातुल घराणे ) विवीध कारणांनी वरचे वर भेटतील आणि जुन्या आठवणी सुखावतील.

वृश्चिक रास : १२ तारखेपर्यंत तुमच्या शत्रुची खैर नाही. सहाव्या स्थानी असलेला मेषेचा मंगळ तुम्हाला शत्रुला नामोहरम करायला रसद पुरवेल. १४ तारखेनंतर प्रशासन विभागात काम करणारे सरकारी नोकर आपल्या पदाचा वापर करुन शत्रुला अडकवुन ठेवतील. आपण कलाकार असाल तर एक उत्तम कलाकृती तुमच्या हातुन निर्माण होण्याचे योग आहेत. ह्या संधीचा शोध घ्या. १५ तारखेनंतर याचा अनुभव वेगाने येताना दिसेल.

धनु रास :  इंजिनीयरींगची परिक्षा देणारे विद्यार्थी १२ एप्रिलपर्यंत परिक्षा असल्यास खुप यश मिळवु शकतील असे योग आहेत. बारा तारखेपर्यंत खेळाडु सुध्दा चमकतील असे योग आहेत. सुख स्थानातला मीनेचा शुक्र धनु राशीच्या लोकांना जे सुख वास्तु, वहाने व  वस्तु मिळवुन देऊ शकतात असे सुख घेऊ शकतील. हे योग अगदी महिनाभर तुमच्या राशीला आहेत.

मकर रास : चतुर्थ स्थानात मंगळ असल्याने १२ तारखेपर्यंत घरात  सुसंवाद होणे जरा दुरापास्त असेल पण १२ तारखेनंतर मात्र वातावरण निवळेल. ह्या वर्षी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणीक यश सहजपणे मिळेल पण अभ्यास करणे आवश्यक आहे. इंजिनीयरींगचे विद्यार्थी १२ तारखेनंतर अगदी मे अखेर चांगले यश मिळवु शकतील.

कुंभ रास: आपल्या राशीचा अधिपती लाभ स्थानात आहे. २६ जानेवारी २०१७ पासुन आपल्याला थोडे मनासारखे घडताना दिसत आहे त्याला थोडासा ब्रेक लागणार आहे. कारण शनि ६ एप्रिल पासुन वक्री होणार आहे. तुमच्या आयुष्यात याने फ़ार मोठे नाही पण मनासारख्या घटना न घडणे असा फ़रक ऑगस्ट पर्यंत दिसु शकतो. तिसर्या स्थानी गेलेला मंगळ तुम्हाला साहस करण्याची प्रेरणा देईल पण तुम्ही साहस करु नका. साहस करणे हा कुंभ राशीचा स्वभाव नाही. मीनेचा शुक्र तुमच्या धनस्थानी आहे. भेळ- पाणीपुरी सारख्या चटकदार पदार्थांची मेजवानी महिनाभर असेल. एकंदरीत ग्रहमान तुम्हाला चांगलेच आहे.

मीन रास : तुमच्या ही राशीचा स्वामी गुरु सप्तमात वक्री आहे. पण लग्नी शुक्रासारखा शुभ ग्रह महिनाभर असणार आहे. शुक्राची गुरुवर आणि गुरुची शुक्रावर दृष्टी आहे. फ़ार बिघडणार नाही. घरात कौटुंबीक वातावरणात १२ एप्रिल पर्यंत ताण असेल. पण नंतर वातावरण निवळेल. बुध फ़ारसा अनुकूल नसल्यामुळे फ़ारसे या महिन्यात फ़ार काही घडेल असे नाही. मागील पानावरुन पुढे सुरु असे ग्रहमान आहे.

नितीन जोगळेकर
ज्योतिषशास्त्री
चिंचवड पुणे
संपर्काकरीता फ़ोन नंबर -9763922176
पत्रिका पाहून ज्योतिषसल्ला  घेण्यासाठी फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन 

माझ्या ब्लॉगवर ज्योतिष विषयक लेखांचा वासंतीक विशेषांक गुढीपाडव्याला प्रसिध्द झाला. हा ज्योतिषप्रेमी साठी कोणत्याही शुल्का शिवाय उपलब्ध आहे. ही लिंक उघडुन वाचा आणि आपल्या स्नेह्यांना ही लिंक पुढे पाठवा. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html

Thursday, March 9, 2017

क्रुपया लेख पुर्ण वाचा 🙏

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?


(ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र)
"गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे.

(एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर)

आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही.

पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची.

आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे.

कोणाचं वाक्य आहे, मला आठवत नाही. पण, बहुधा नेपोलियनचं असावं.

If you can’t convince, confuse.

'लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या.'

मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही.

पण, डॉ. राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं.

हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते.

यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील.

त्यांनी प्रस्तुत दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद ठरेल.

काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.)

ह्या सर्वांतून प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते.

ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले.

१-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ(कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.

कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते.,

सोली सोराबजी ₹२० लक्ष,
कपिल सिब्बल ₹२२ लक्ष,
महेश जेठमलानी (राम  जेठमलानींचे पुत्र) ₹३२ ते ३४ लक्ष.

हे कसायांच्या बाजूने उभे होते.

राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता.

 कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता.

दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.”
न्यायाधीशांनी विचारले,
“आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.”
त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.

गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.

कसायांचे दावे :
(१) गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात करतो.

(२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय.

(३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार?

(४) गायींमुळं परकीय चलनही मिळते.

(५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.”

दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे.

आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल.

त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात.

दीक्षितांनी सर्व आकडेवारी 7न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा ५० डालर    मिळतात म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात. म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….

एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?”

त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं.

ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.”

जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले,

“ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे. न्यायालयाने ते मान्य केले.

दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. १ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर झाले.

 गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”

सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.
आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.

आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते.

एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव मिळतो.

अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.

अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.

अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून  प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये) झाले.

पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.

न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.”
त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, "एक्सलंट!!"

कारण, त्यांना प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.

आणखी, मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, “प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”

भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.

ही सगळी आकडेवारी जेव्हा दीक्षितांनी न्यायाधीशांसमोर मांडली, तेव्हा, गायीची हत्या करण्यापेक्षा तिला वाचवण्याने देशाचा आर्थिक लाभ अधिक आहे, हे त्यांनी मान्य केले.

न्यायालयाचे हे मत जेव्हा कसायांना समजले, तेव्हा ते संतापले. आपला पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसू लागला.

गोहत्येपासून ७० सहस्र रुपयांचा लाभ होतो, असे ते म्हणाले होते. पण तिची हत्या केली नाही, तर तिच्यापासून कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो. आणि आजवर हे कुणी सांगितलंसुद्धा नव्हतं. तर पटवून सिद्ध करण्याची गोष्टच उद्भवली नाही.

(आणि गायींची पैदास वाढवली तर आपण गॅस निर्यातही करू शकू. इंधनाची समस्या उरणारच नाही. वर आपल्या बाळांना अधिकाधिक दूध देऊ शकू.)

मग कसायांनी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. ते म्हणाले, “गोहत्या करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे.”

त्यावर दीक्षित म्हणाले, “त्याकरता कुराण, शरियत, हदीस हे सगळे ग्रंथ आम्ही न्यायालयासमोर आणतो. गाईची कत्तल करा असे त्यात कोठे लिहिले आहे, ते आम्हालाही जाणून घ्यायाचे आहेच. गायींची हत्या करा, असे त्यात कुठेही लिहिलेले नाही, असे आपल्या लक्षात येईल.

उलट, 'गायीचे रक्षण करा!' असेच हदीसमध्ये म्हटले आहे, कारण तीही तुमचे रक्षण करते. गाय मुका प्राणी आहे, म्हणून तिच्यावर दया करा, असेच महमद पैगंबर ह्यांचे विधान आहे.

गायीची हत्या कराल तर दोझकमध्येसुद्धा जागा मिळणार नाही, जहान्नमध्येही जागा मिळणार नाही, असेही आणखी एके ठिकाणी म्हटले आहे.

तर मग गायीची हत्या करण्याचा अधिकार त्यांना केव्हापासून मिळाला? विचारा ह्या कसायांना.”

तेव्हा कसाई निरुत्तर झाले.

दीक्षित पुढे म्हणाले, “मक्का, मदीनामध्ये काही ग्रंथ असतील तर तेही घेऊन या.”

मग न्यायालयाने एक महिन्याची मुदत दिली. आणि गायीची हत्या करणे हा इस्लामचा मूलभूत अधिकार आहे, असा आदेश असलेले असे काही दस्तऐवज असतील तर घेऊन येण्याचा आदेश दिला.

एक महिन्यात काहीही पुरावा मिळाला नाही. आता आणखी वेळ देता येत नाही, असे म्हणून न्यायालयाने २६ ऑक्टोबर २००५ला (बरोबर १० वर्षांपूर्वी) आपला निर्णय दिला.



ह्या निर्णयाची प्रत आपल्याला www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर जाऊन पाहता येईल.

हे निकालपत्र ६६ पानी आहे. तो निर्णय देऊन न्यायालयाने इतिहास घडवला आहे.

निर्णयात न्यायालय म्हणते, गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागिकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे.

आजपर्यंत जी संवैधानिक कर्तव्ये होती (उदा. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, क्रांतिकारकांचा आदर करणे, देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणे), आता गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्यांमध्ये भर घातली गेली आहे.

1998च्या भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही.  अमेरिकेने याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला.
भारताची 1. पारम्पारिक शेती, 2 . कुटुंब व्यवस्था 3. भारतीय नीतिमूल्ये या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता सम्पणार नाही. गोधन सम्पवणे, भारतीय बियाणी सम्पविणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये सम्पविणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातला एक भाग.

हे फार मोठे षड्यंत्र आहे.
सर्वानी समजून घेतले तरच निभाव लागेल.

जास्तीजास्त लोकांपर्यत पोहचवा.

Wednesday, March 8, 2017

१४ मार्च ते १३ ऐप्रिल २०१७ या मीन महिन्याचे भविष्य आणि वासंतीक अंकाची घोषणा

इंग्रजी महिन्याची १ तारीख आली म्हणजे मला वेध लागतात १४- १५ तारखेला सुरु होणार्या नविन रवि महिन्याचे. १५ मार्चला सुरु होतोय रविचा मीन महिना. अनेक लोक नव्याने वाचु लागल्याने त्यांना हे समजत नाही की हे काय आहे ? दर महिन्याला साधारणपणे १४-१५ तारखेला रवि राशी बदलतो. कोणी इंग्रजी महिन्याचा संदर्भ घेऊन राशीभविष्य लिहतात. मी सुर्य महिना घेऊन लिहतो.

या महिन्याच्या मध्यावर म्हणजेच २८ मार्च रोजी गुढीपाडवा आहे.  वर्षा ‍‌‌‌‍‌ऋतु संपल्यावर अश्विन या महिन्यासोबत  येणारा शरद ‌ऋतु सृष्टीमध्ये नवचैतन्य घेऊन येतो तसेच शिशीर ‌ऋतु संपुन चैत्र महिन्याबरोबर येणारा वसंत ‌ऋतु सुध्दा नवचैतन्य घेऊन येतो. झाडांना येणारी नविन पालवी येते. हा ‌‌‌ऋतु बदल आनंददायी असतो. नविन वर्ष अर्थात शके १९३९ अर्थात हेमलंबीनाम संवत्सराची सुरवात होत आहे. या निमीत्ताने नक्षत्रप्रकाश चा वासंतीक अंक प्रकाशीत करण्याचा संकल्प आहे. याचा सोहळा फ़ेसबुक वरुन दिसेल तसेच याची लिंक ही त्याच वेळेला प्रकाशीत होईल. या निमीत्ताने आपल्या सर्वांना नविन लेख वाचावयास मिळतील तसेच ज्योतिष संशोधनाच्या कार्यास आपला हातभार लागेल. नेमके काय संशोधन करायचे आहे हे आपणासर्वांना वासंतीक अंक वाचला की समजेल.

गुढीपाडव्यास पंचांगावरील श्रीगणपतीचे पुजन करुन वर्षफ़ल ऐकुन वर्षाची सुरवात करण्याची प्रथा आहे. पंचांग आणले नसेल तर आणा. आपली संस्कृती काही चांगल्या प्रथा व त्याचे अर्थ यावर विवीध लेख दाते पंचांगात असतात. याचा उपयोग संस्कृती संवर्धनासाठी होणार आहे.

मीन या रवि महिन्याच्या या राशीभविष्याची सुरवात होताना ७ ऐप्रील २०१७ रोजी हर्षल हा ग्रह मीन राशीतुन मेष राशीत जातो. हर्षल हा ग्रह जसा अधुनिकतेचा कर्ता आहे, बुध्दीमत्तेचा, संशोधनाला चालना देणारा आहे तसाच तो स्फ़ोटक ग्रह आहे.  त्यात मेष रास ही अग्नितत्वाची रास असल्याने काही वेगळे परीणाम विवीध राशींच्या लोकांना अनुभवास येतील. या बाबतचा लेख वासंतीक अंकात वाचावयास मिळेल.

आता १४ मार्च २०१७ ते १३ ऐप्रील २०१७ या कालावधीचे राशीभविष्य पाहू

मेष रास : मेष राशीला ७ ऐप्रीलपासून एका नव्या पर्वाला सामोरे जावे लागणार आहे. ७ ऐप्रीलला तुमच्या राशीत येणारा हर्षल आधीच येऊन बसलेला मंगळ. आधीच उन्हाळा, रास अग्नि तत्वाची त्यात आग ओकणारे दोन ग्रह तुमच्या राशीला आहेत. त्यांची युती नाही ही एक समाधानाची बाब आहे. मंगळ १३ ऐप्रीलला तुमच्या राशीतुन बाहेर पडतो आहे तर रवि १४ ऐप्रीलला तुमच्या राशीत जाणार आहे. या महिन्यात फ़ारशी झळ नाही. तुमचे नक्षत्र अश्विनी असेल तर तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत होणारा बदल हर्षलच्या राशीबदलानंतर जाणवायला लागेल. याबाबत आपण वासंतीक अंकात पाहुच. भरणी आणि कृतीकेला मनोवृत्तीत बदल व्हायला अजुन वेळ आहे.

भावंडांसंदर्भात चिंता असेल तर ती २७ तारखेच्या आसपास कमी होईल. गेले महिनाभर खुप प्रवास झाला असेल आता कमी होईल. मेषेत असलेल्या मंगळाने तुमच्या मुळच्या उतावीळ स्वभावाला महिनाभर खत पाणी घातले असेल. आता जरा तुम्ही शांतपणे विचार कराल. सिंह सुध्दा सिंहावलोकन म्हणजे मागे वळुन पहातो तसे करा. तुमच्या उपद्रव मुल्याने कोणाला त्रास झाला असेल तर जरा वेळीच सॉरी म्हणा. २९ ३०  मार्च ला कटकटी वाढतील. मनस्ताप होईल. डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेवा. हे सर्वकाळ जमण आपल्याला अशक्य आहे पण कधी तरी स्वभावाला मुरड घालायला हवी.

वृषभ रास :  मंगळ तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानी जात आहे. नको तेव्हढा खर्च महिनाभर आहे. याची तजविज करायला लागा. हा मंगळ चिंता ही देईल. घरात कोणीतरी वहान वेगाने चालवुन अपघात घडवेल किंवा आगीसारख्या घटना घडणार नाहीत ना या साठी काळजी घ्या. घरातल्या तरुणांच्या कृतीकडे खास करुन लक्ष द्या. त्यांचे चित्त विचलीत होईल अश्या घटना किमान महिनाभर घडु देऊ नका.

शेअर बाजारात तुम्हाला स्वारस्य असेल तर २७ मार्च पुर्वी जोखीम असलेले शेअर्सवर लक्ष द्या. योग्य तो सल्ला घेऊन ते शेअर्स काढायचा सल्ला मिळत असल्यास तो माना. २७ मार्चनंतर आपल्या मुलांची परिक्षा असल्यास त्या पेपर्सचा जास्त अभ्यास करण्याचा सल्ला ही मुलांना द्या. खास करुन गणित विषय नाहीना आणि मुलांना तो कठीण जात नाही ना ह्याची तपासणी करा. आजकाल पाल्यांची कमी तर पालकांची परिक्षा पदोपदी असते.


मिथुन रास : हा महिना तुम्हाला अनेक घटना घडताना दिसणार आहेत. लाभ स्थानात येणारा मंगळ तुम्हाला लाभ देऊन जाणार आहे. एखाद्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजुने लागेल. नोकरीत /व्यवसायात गेले महिनाभर झालेली पळापळ कमी होईल. ७ ऐप्रीलला येणारा हर्षल तुम्हाला एखादे नवे व्यावसायीक अकाऊंट उघडुन देईल. हा लाभ अधुनीक तंत्राचा फ़ायदा घेऊन होईल. दशमामध्ये येणारा रवि एक महिनाभर तुम्हाला मान मिळवुन देईल. तुमचे प्रमोशन अपेक्षीत असल्यास त्या संदर्भात हालचाली घडवील. तुमचे लेखन प्रसिध्द होईल.

गेले महिनाभर तुमच्या कलेला प्रसिध्दी मिळायचे योग येत असतील. या महिन्यात जरा त्यात अडचणी येतील. ह्या महिन्यात येणार्या अडचणी संपल्या की पुन्हा चांगले दिवस येतील. त्यामुळे निराश न होता या संधीचा पाठपुरावा करा.

कर्क रास : गेले महिनाभर काही आरोग्याच्या तक्रारी असतील त्या आता संपतील. नोकरी व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. महिनाभर यामुळे दगदग होणार आहे. हा मंगळ नुसतीच दगदग देईल असे नाही तर तुमच्या कला कौशल्याला नविन व्यासपीठ मिळवुन देईल. तुम्ही खेळाडु असाल तर अनेक स्पर्धा पुढील महिन्यात असतील तर त्या तुम्ही गाजवाल. या निमीत्ताने काही करार होऊन त्यातुन तुमचे उत्पन्न वाढणार आहे.  ७ ऐप्रीलला दशमास्थानात येणारा हर्षल तुम्हाला नविन तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काही संधी घेऊन येणार आहे. ही अत्यंत अधुनिक वातावरणात जाण्याची एक संधी आहे.

२०-२१ तारखेला मनस्ताप संभवतो. २५- २६ तारखेला काही गुढ गोष्टी समजतील. ३०-३१ मार्चला तुम्ही अचानक प्रसिध्दीच्या झोतात याल. एकंदरीत विवीध घटनांनी भरलेला हा महिना आहे.

सिंह रास : रवि मीन राशीत जाणे ही तुमच्या साठी चांगली ग्रहस्थिती नाही. त्यात दशमेश शुक्र वक्री होऊन अष्टमात पडल्याने अजुनच चमत्कारीक परिस्थीती असेल. मंगळच काय तो तुमच्या मदतीला असेल. जबरदस्त ताकदीच्या सिंहाला जंगलातुन पकडुन पिंजर्यात कोंडल्यासारखे आहे.  पण हे फ़क्त महिनाभर. जेव्हा हाच रवि मेषेत जाईल तेव्हा पिंजरा तुम्हाला थांबवु शकणार नाही. तुमच्या डरकाळीने तुम्ही पुन्हा आपली पत मिळवाल.

चांगला भाग आहे तो म्हणजे ७ ऐप्रीलला बदलणारा हर्षल तुमच्या भाग्यस्थानात जाईल. जेव्हा जेव्हा तुमच्या राशीच्या अधिपती चंद्र ह्या हर्षलशी योग करेल तेव्हा सत्ता संपादन असुदे किंवा तुम्ही नियंत्रण करणार असाल अशी परिस्थीती अजुन उत्तम रित्या कशी हाताळावी याचा नविन फ़ॉर्म्युला दर महिन्याला तुमच्या चिंतनाने तुम्हाला गवसेल.

या महिन्यात तुम्हाला चांगले काही घडताना दिसले माही तरी दिर्घकाळ सत्ता, पत संभाळु शकाल असे मार्ग या महिन्याच्या शेवटी सापडतील.

कन्या रास :  तुमच्या चिंतनाला एक उत्तम दिशा गवसण्याचे ग्रहमान या महिन्यात निर्माण होऊन ते दिर्घकाळ तुम्हाला साथ देईल. मंगळ अष्टम स्थानी गेल्यावर उष्णतेचे विकार महिनाभर त्रास देतील. आधीच तुमचे पचन मंद असते त्यात अ‍ॅसिडीटी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील.  २७ मार्च नंतर बुध प्रतिकुल झाल्याने प्रतिकार शक्ती कमी होऊन अजुन त्रास संभवतो. योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचा विचार कराल तरच महिना बरा जाईल.

परदेशातुन काही व्यावसायीक प्रस्ताव या महिन्यात येतील. व्यापार करत असाल तर या कडे डोळेझाक करु नका. काही महत्वाचे व्यावसायीक निर्णय २७ मार्च पुर्वीच घ्या. अविवाहीत असाल तर लग्न जमण्याचा प्रक्रियेत अचानक अडथळे आल्याचे भासेल पण लांबलेली बोलणी महिना अखेरीला पुढे सरकुन निर्णय होतील असे ग्रहमान आहे.

तुला रास : तुमचे सप्तम स्थानी मंगळ येत आहे. महिनाभर रवि सहाव्या म्हणजे शत्रु स्थानी असणार असणार आहे. याशिवाय तुमचा राशी स्वामी षष्ठ स्थानी असल्याने तुमची शक्ती कमी झालेली आहे. नोकरी /व्यवसायात कटकटी १३ एप्रिल पर्यंत जास्त असतील. हा मंगळ तुमचा शत्रु कुरघोडी करतो की काय अशी स्थिती आहे. जेव्हा काही मित्र शत्रु होतात तेव्हा " हेची काय फ़ळ मम तपाला" असे म्हणण्याची वेळ येते असे काहीसे ग्रहमान वर्षभर आहे. त्यात ७ ऐप्रिलला सप्तमात येणारा हर्षल काय ग्रहमान घेऊन येतो ते वैयक्तीक लग्न कुंडलीत तपासावे लागणार आहे.अर्थातच सर्वांना हर्षल खराब असेल असे नाही.

सप्तमस्थानातला मंगळ अनेकांना नोकरी व्यवसायात काही संधी देऊन जाईल. काही व्यावसायीक लाभ सुध्दा होतील पण याला संघर्षाची झालर असेल. जुनी व्यावसायीक येणी येत नसतील तर कटु शब्द बोला. तुमच्या स्वभावाचा फ़ायदा घेऊन जर लोक तुम्हाला बुडवत असतील तर आता यादीच काढा आणि कटु शब्द ठरवुनच बोला. पहा काय परिणाम घडतो.

वृश्चिक रास : तुमच्या सहाव्या स्थानी मंगळ येत आहे. तसेच पाचव्या स्थानी रवि असणार आहे. हीच वेळ आहे शत्रुला गाफ़ील ठेऊन हालचाली करण्याची. तुमच्या हालचाली प्रभावी ठरतील. तुम्ही परिस्थितीवर नेमके नियंत्रण मिळवाल.

अविवाहीत तरुण काही प्रेमाचे शब्द बोलायला गेलात तर ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम करतात असे वाटणार नाही. पण प्रयत्न सोडु नका. याच महिन्यात तुम्हाला अजुन संधी मिळणार आहेत जेव्हा तुमचा प्रभाव पडुन होकार सुध्दा मिळु शकेल.

तुम्ही व्यवसायीक असाल तर उत्तम व्यावसायीक संधी खासकरुन नविन तंत्रज्ञान संदर्भात तुमचे दार ठोठावतील. या संदर्भात आपल्या जन्मपत्रिकेचे आकलन करुन व्यापार वृध्दी करण्याचे योग तुम्हाला नजिकच्या काळात आहेत.

धनु रास : मागील महिन्यात शनि बदल झाला असुन मुळ नक्षत्र असलेल्यांना साडेसाती जाणवेल. मंगळ मेषेत गेल्याने संतती संदर्भात चिंतेचे वातावरण राहील. मुलांची शैक्षणिक चिंता करावी लागेल. नोकरी व्यवसायात काही अपुर्व संधी डोकावतील. याचे पुर्ण विश्लेषण करुन मगच संधी घेणे योग्य ठरेल.

मीन रास तुमच्या चतुर्थात असुन शुक्र महाराज तिथे बराच वास करुन आहेत. किंचित व्यस्तता असली तरी सुखनिद्रा नक्कीच मिळेल. १५ मार्च, २४ मार्च या तारखांना तसेच १ एप्रीलला काही खास योग तुम्हाला फ़ळे देऊन जातील.

मकर रास :  नुकतीच साडेसाती सुरु झाली असली तरी ग्रहमान फ़ारसे तापदायक नाही परंतु चतुर्थ म्हणजे सुख स्थानी येणार मंगळ १ मार्च पासुन काहीसा त्रासदायक होईल. कामावर थोडा ताण वाढेल. साडेसाती संपे पर्यंत कोणतेही काम सुखा सुखी घडणार नाही. मकर रास सहनशील असली तरी त्याचा त्रास नक्की जाणवेल. ही स्थिती १४ एप्रिल पर्यंत आहे. अजुनही गुरुची शुभ दृष्टी असल्याने त्यातही खुप त्रास न होता सर्व स्तरावर पुढे जात रहाल असेच ग्रहमान आहे. गुरु वक्री असला तरी थोडासा चांगला प्रभाव आहेच त्यामुळे चिंता करावी असे नाही.

भावंडे काही प्रस्ताव देऊन गेली असतील तर त्यावर मार्ग निघेल. ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांना चांगले लेखन हातावेगळे करता येईल. काही  सुचत असल्यास लिहुन टाका. २७ मार्च पर्यंत बुध म्हणजे शब्द तुम्हाला सहाय करतील. लेखक नसाल तरी तुमचे शब्द अनेक कामे मार्गी लागण्यास सहायभूत होतील. शब्द फ़क्त मधात भिजवा, साखरेत लोळवा आणि गंमत पहा.

कुंभ रास : गेले महिनाभर शनिने मुक्काम दशमस्थानातुन हलवल्यामुळे नोकरी- व्यवसायात किंचीत शांतता अनुभवत आहात.  मीनेतला  शुक्र कुटुंबस्थानी आल्यावर भेळ, वडापाव या सारखे पदार्थ तुम्हाला वारंवार समोर येतील. एकंदरीत या दृष्टीने चैन सुरु आहे. असे असले तरी मेषेतला मंगळ येत असल्याने भावंडाकडुन थोडासा मनस्ताप होईल असे दिसते. वडिलधारे मंडळी, लहान भावंडे यांचा गोतावळा जमा होईल. चर्चेतुन नक्कीच कठीण प्रसंगातुन मार्ग मिळत असतो. यामुळे चर्चा टाळु नका.

कुंभ रास ज्योतिष प्रेमी असते असा अनुभव आहे. कालनिर्णयचे वार्षीक भविष्य वाचुन झाले की पंचांगाताले वाचायचे. दर महिन्याचे किंवा दररोजचे राशी भविष्य चुकवायचे नाही हा तुमचा परिपाठ असतो. मी त्यामुळेच कुंभ राशीचे भविष्य अजुनच काळजीपुर्वक लिहीतो. पण आपल्या कार्यशक्तीवरचा विश्वास वाढवा. तुम्ही भविष्य बदलु शकाल असा अनुभव या महिन्यात थोडेसे धाडस केलेत की येईलच.


मीन रास : १४ मार्चला रवि लग्न स्थानी येत असल्याने जर महिनाभर मानहानी होण्याचे प्रसंग आले असतील. सरकारी कामे होत नसतील किंवा वडीलांशी वाद होत असतील तर आता ते कमी होतील.  आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर आता बरे वाटेल. कुटुंबस्थानी मंगळ आल्याने तिखट मेजवानी होणार आहे.

तरुण मंडळी मीनेत शुक्र  असल्यामुळे आरश्यासमोर दिर्घकाळ रहातील. एखादी फ़ॅशन किंवा हेअर स्टाईल तुम्हाला कशी सुट होते याकडे लक्ष जाऊन या दृष्टीने बरेच प्रयोग होतील. स्त्रीयांनीच ब्युटी पार्लर मधे जावे असे थोडीच आहे. तरुण मुले आणि पुरुष सुध्दा या विश्वात रमतील असे ग्रहमान आहे. ज्यांचा विवाह व्हायचा आहे, हा महिना फ़ारसा फ़लदायी ठरला नाही तरी बोलणी पुढे सरकतील हे नक्की.

शुभंभवतु