Thursday, November 7, 2019

मासीक राशीभविष्य १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१९ ( मेष ते कन्या राशी साठी )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहे
शुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन ५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.

थोडक्यात रवि आणि बुध व शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षल
आणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.

या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.



मेष रास:

आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर तुळ राशीत असल्यामुळे "मुग गिळून रहाणे" ह्या शब्द प्रयोगाचा अनुभव महिनाभर येणार आहे. तुमचा स्वभाव उसळून प्रतिक्रिया देण्याचा असला तरी अशी प्रतिक्रिया आपण देऊ शकणार नाही. शत्रु सोबत व्यावहारीक तडजोड आपण करणार आहात. कदाचित याही मुळे शत्रुबाबत सुध्दा आपल्याला प्रतिक्रिया देण्याची संधी ५ डिसेंबर पर्यंत नाही.

२४ नोव्हेंबरला होणारी मंगळ हर्षल प्रतियुती तुमच्या आयुष्यात एखादी नको असलेली घटना घडवणार नाही ना याबाबत सावध असावे. किमान या दिवशी वाहनावर असाल तर डोक्याला हेल्मेट किंवा सिट बेल्ट, वेग कमी आणि सावधानता बाळगल्यास अप्रिय घडू नये.

२१ नोव्हेंबर २०१९ पासून पुढे महिनाभर आपल्या वैवाहीक जोडीदाराला चांगले दिवस येणार आहेत. जोडीदार खुष तर आपणही खुष असे म्हणण्याचा आपला स्वभाव नाही. आपण आपली स्पेस, आवडी निवडी याबाबत आग्रही असला तरी ही बाब आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात चांगले काही घडत असेल तर याबाबत आनंद व्यक्त करण्याची आहे हे सांगायला नको.

वृषभ रास:

आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबरला धनु राशीत जाणार आहे. धनु रास तुमच्या राशीकडून नेमकी आठवी असते. यामुळे महिनाभर तुम्हाला चेक आणि मेट अशी अवस्था असेल. तशात २४ नोव्हेंबरला  शुक्र आणि गुरुची युती आठव्या स्थानी झाल्यावर इतर राशींना जी चांगली फ़ळे मिलणार आहेत अशी तुम्हाला मिळणार नाहीत. आपण डॉक्टर असाल तर मात्र एखादया निष्णांत डॉक्टर कडून आपल्याला उत्तम टीप्स मिळतील.

शुक्र आणि शनिची युती ११ डिसेंबरला होत आहे. अनेकांना हा दिवस स्मरणात राहील असा असेल. आपण आणि आपले वरिष्ठ जर खोलात जाऊन काही शोध घेत असाल तर नक्कीच आपल्या कलेची चुणूक त्यांना दिसेल. महिन्याच्या शेवटी होणारी प्लुटो आणि शुक्र युती अनेक तरुणांचा ब्रेक अप करणारी असेल.

मिथुन रास :

आपल्या राशीचा मालक बुध तुळ राशीत महिन्याच्या सुरवातीपासून वक्री असणार आहे. २१ नोव्हेंबरला तो एकदा मार्गी झाल्यावर तुम्हाला तुमचा सुर गवसणार आहे. शाब्दीक फ़टकेबाजीला जणू कित्येक दिवस बांधून ठेवले होते त्याचे पारणे अनेकांशी किती बोलू या पध्दतीने तुम्ही फ़ेडणार आहात. नेहमीच्या हास्य विनोदाने पुन्हा वातावरण हलके फ़ुलके करुन टाकणार आहात.

५ डिसेंबरला बुध वृश्चिक राशित जाईपर्यंत महत्वाची कामे मार्गी लावा. अनेक तरुणांना २४ नोव्हेंबरला प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस आहे असे वाटते. इथे जोडीदारच तुम्हाला प्रपोज करणार असल्यामुळे प्रपोज करण्यासाठी वातावरण निर्माण करा. जोडीदाराला आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल असे वातावरण ठेवा म्हणजे महिन्याच्या शेवटी कटू प्रसंग येणार नाहीत.

कर्क रास :

या महिन्यात संततीच्या डिमांड वाढणार आहेत. दिवाळी होऊन गेली तरी हे पाहीजे ते पाहिजे असे चित्र या महिन्यात दिसेल. बाल हट्ट पुरवला पाहिजे म्हणून तरतुद करा. या महिन्यात २१ तारखेनंतर आपल्याला स्वत: चे आजारपण यामुळे किंवा मित्राने केलेल्या फ़सवणुकी मुळे खर्च वाढू शकेल. हे कमी की काय २१ तारखेनंतर मातेशी वाद विवाद वाढू शकतात. आपण खरेदी केलेल्या घरगुती वस्तु खराब निघाल्याने आपल्याला कस्टमर केअर बरोबर वाद विवाद करुन वस्तू बदलून आणण्यासाठी परिश्रम पडतील.

विद्यार्थी वर्गाला २१ नोव्हेंबर नंतर अभ्यास कसा करावा याचे तंत्र किंवा एखाद्या विषयाचे मर्म समजेल जेणे करुन डिसेंबर मधे एखादी परिक्षा असेल त्यात यश मिळेल. एकंदरीत विद्यार्थी वर्गाला हा महिना अभ्यास किंवा परिक्षामधे यश या दृष्टीने चांगला जाईल.

सिंह रास :

आपल्या राशीचा मालक रवि महिनाभर चवथ्या स्थानी असणार आहे. ही अवस्था जंगलच्या राजाला पिंजर्यात बांधुन ठेवल्याची आहे. पण या निमीत्ताने घरच्या मंडळींना वेळ देता येईल, त्यांच्या समवेत सुख वार्ता आणि उत्कृष्ट घरच्या जेवणाचा तसेच वामकुक्षी अर्थात पॉवर नॅप चे योग या महिन्यात वारंवार येतील.

या महिन्यात नोकरी/व्यवसायात आपल्या हाताखालच्या लोकांना नविन कामाची पध्दत असो की अन्य काही, फ़ॉर्मल ट्रेनिंग च्या माध्यमातून शिकवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. हीच एक संधी असते की आपण लोकांना आपल्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीने अपेक्षा समजाऊन सांगण्याची. हे काम आपण उत्तम करुन हाताखालच्या लोकांना आपलेसे कराल. आपण करत असलेले प्रेझेंटेशन मुळे काही विरोधाभास निर्माण होत नाही ना याची मात्र काळजी घ्या. अनेकदा सरकारी फ़तवे अश्या controversy मुळे अर्थहीन होतात.

कन्या रास:

आपल्या राशीचा मालक बुध २१ नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीत वक्री असणार आहे. त्यामुळे २१ तारखेपर्यंत आपले आराखडे, पैसे नियोजनातली आकडेमोड मनाप्रमाणे होणार नाही. काहीतरी चुकत आहे असे वाटत राहील. २१ तारखेनंतर मात्र घोळ समजेल आणि हायसे वाटेल. बॅंक किंवा फ़ायनान्स क्षेत्रातील लोकांना सुध्दा २१ तारखेनंतर थोडी उसंत मिळेल.

कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात लिखाणाची आवड असेल तर भरपुर लिखाण एकटाकी हातावेगळे करता येईल. आजकाल सोशल मिडीयावर नियम फ़ार कडक होत असल्यामुळे धाडसाने काही लिहून अंगाशी येणार नाही ना येवढे पहा.

आपल्याला या महिन्यात एखाद्या आर्थिक विषयावर किंवा धार्मिक विषयावरील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळण्याचा योग बाहेर कुठेही न जाता एक तर दुरदर्शन वर मिळेल किंवा अशी व्यक्ती चालून घरी येईल. दिवाळी संपली असली तरी ज्ञान हीच दिवाळी असा अनुभव येईल.

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )

Monday, October 28, 2019

आपल्या मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? उपाय रुक्मिणी स्वयंवर


हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो आणि मुलांचा विवाह लांबलेला आहे म्हणून काळजीत असलेले पालक हो तसेच उपवर विवाह इच्छुक मुलांनो.

मी युट्युबर वर विवाह विषयावर १२ व्हिडिओ तयार केलेल्या आहेत. ज्यांनी आजपर्यंत पाहीलेल्या नसतील तर जरुर पहा. या सर्व व्हिडिओ पहाण्यासाठी ही प्ले लिस्ट पहा.

मुलांचा विवाह वेळेवर व्हावा म्हणून मी सहा उपाय सांगीतले आहेत. यातील चार मुख्य उपाय आहेत तर दोन उपाय हे मुख्य उपायाला पुरक ( सपोर्टींग ) उपाय आहेत. हे मुख्य उपाय खालील प्रमाणे.

१) रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे संपुटयुक्त १८ पारायणे - याची व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=0VTG22kFw_0&t=80s
२) ब्रह्मणस्पती सुक्त हवन याची - व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=TKmeL3ybpKE
३) श्रीगजानन विजय ग्रंथाचे संपुटयुक्त ३ पारायणे - याची व्हिडीओ पहा
४) कात्यायनी पुजन येणार्या ३ अक्टोंबर २०१९ ला करा - याची व्हिडीओ पहा
५) हळकुंडे प्रयोग ( पुरक उपाय )- याची व्हिडीओ पहा
६) ओपल उपरत्न वापरणे ( पुरक उपाय ) - याची व्हिडीओ पहा

नुकतीच १७ सप्टेंबर २०१९ ला अंगारिका चतुर्थी होऊन गेली. आता नजदिकच्या काळात अंगारिका चतुर्थी नाही. येणार्या २०२० मधे अंगारिका चतुर्थी नसल्यामुळे साल २०२० मधे एका दिवसात होणारा  ब्रह्मणस्पती सुत्र हवन हा प्रयोग करता येणार नाही. ज्यांचा विवाह लांबला आहे अश्या उपवर विवाहइच्छुक मुलांना येणार्या वर्षात रुक्मिणी स्वयंवर पारायण , श्रीगजानन विजय पारायण किंवा कात्यायनी पुजा या वर्षातून फ़क्त दोनदा करता येणार्या उपायावर अवलंबुन रहावे लागणार आहे.

रुक्मिणी स्वयंवर हा उपाय मी दोन व्हिडीओ च्या माध्यमातून सांगूनही मला पुन्हा पुन्हा या विषयावर प्रश्न विचारले जातात. या साठी ही पोस्ट मी तयार करतो आहे.

रुक्मिणी स्वयंवर हा उपाय पारंपारिक आहे. विवाह होण्यासाठी अडचणी येत असतील तर उपाय म्हणून महाराष्ट्रात परिचीत आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचन हे तप आहे. हे तप केल्याने आपल्या जन्मकुंडली मधील दोष नाहीसे होऊन विवाह जमणे शक्य होईल.  रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी साधारण ४५० वर्षांपुर्वी लिहलेला आहे. हा मुळ ग्रंथ अत्यंत रसाळ आहे.

रुक्मिणी स्वयंवर हे पुस्तक मागवण्यासाठी ही लिंक वापरा. https://www.amazon.in/gp/product/B07B8VYC7X/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=3638&creative=24630&creativeASIN=B07B8VYC7X&linkCode=as2&tag=nitinjoglekar-21&linkId=681900d29554b257ddcec60921f6da78

शास्त्र असे सांगते ( उतरार्थ ) या वेदवाणी प्रकाशनाच्या पुस्तकामधे हा उपाय म्हणजे १८ पारायणे सुरु करण्यापुर्वी करायचा  संकल्प आहे. संकल्पाशिवाय कोणतीही पुजा किंवा तप फ़लदायी होत नाही. यासाठी सर्वप्रथम आपण संकल्प करणे आवश्यक आहे.

हे पुस्तक विकत हवे असेल तर त्याची ऑन लाईन मागवण्यासाठीची माहिती इथे आहे.

Shastra Ase Sangte ( Utaradha ) -   https://amzn.to/2NQixzf

याप्रमाणे संकल्प करण्यासाठी वेदवाणी प्रकाशनचे हे पुस्तक विकत घ्या. यातील संकल्प वाचून ते संस्कृत आत्मसात करा किंवा आपल्या परीचयाच्या संस्कृत वाचू शकणार्या व्यक्तीकडून संकल्पाचे उच्चारण कसे करायचे समजून घ्या. यामधे ज्या दिवशी हा संकल्प करणार त्या दिवसाचे नक्षत्र कालनिर्णय पाहून योग्य ठिकाणी म्हणा.

थोडक्यात संकल्पाला खुप महत्व आहे. संकल्पामधे हातात पाणी घेऊन हे संकल्पाचे ते वाक्य संपल्यावर हातातील पाणी सोडणे  हे तंत्र आहे. यामुळे हा संकल्प आपण विसरत नाही. संकल्पाप्रमाणे सगळी पारायणे पुर्ण झाल्यावर त्याचे कालांतराने फ़ळ मिळते. शास्त्र असे सांगते या पुस्तकात पान १०० वर दिल्याप्रमाणे हे करा. यासाठी कोणताही पर्याय नाही.

अनेक पालकांनी आमची मुलगी किंवा मुलगा मराठी मिडीयम मधे शिकलेला नाही. त्यांना ही मराठी पोथी मधील शब्द उच्चारता येत नाहीत. मराठी नीट वाचता न आल्यामुळे वेगाने वाचता येत नाही यासारखे सारखे प्रश्न पालकांनी विचारल्यामुळे मी एक पर्याय घेऊन आलो आहे.

संकल्पाचे वाचन झाल्यावर पुजा झाल्यावर , पोथीचे पुजन झाल्यावर पहिल्या दिवशी करायचे वाचनाची म्हणजे सातवा अध्याय, पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि सातवा  जर युट्युब वर ऐकायला मिळाला तर पोथी वाचन सोपे होईल. कानाने ऐकायचे, डोळ्यांनी वाचन करायचे आणि त्याप्रमाणे उच्चार करायचे. असे केले तर वाचन सोपे होईल असे वाटते.

१ ते १८ अध्यायांच्या १८ व्हिडीओ करण्यासाठी मी धार्मिक प्रकाशनाची पोथीचा उपयोग केला आहे. आपणही याच प्रकाशनाची पोथी घ्यावी. उद्देश असा की विवीध प्रकाशनाच्या पोठीमधे काही पाठभेद म्हणजे वेगळे शब्द जर आलेले असतील तर यामुळे जे ऐकतो आहे ते आणि जे वाचतो आहे त्यात फ़रक असू नये.

हा उपाय करणार्या उपवर मुलांनी हे लक्षात ठेवावे की टी.व्ही पहाताना, प्रवासात, कानाला युट्युब इयर फ़ोन लाऊन ही पारायणे करणे याने अपेक्षीत फ़ळ मिळणार नाही. अंघोळ करुन शुचीर्भूत होऊन , पोथी समोर ठेऊन कानाला फ़क्त वाचन सोपे व्हावे म्हणून हेडफ़ोन लाऊन हे वाचन करायचे आहे. शास्त्र असे सांगते मधले वाचनाचे कोणतेही नियम शिथील केलेले नसून फ़क्त पोथीतील आज प्रचलीत नसलेले शब्द उच्चार सोपे व्हावे हा उद्देश आहे. थोडक्यात कानाने रुक्मिणी स्वयंवर हेडफ़ोन लाऊन ऐकणे, त्याच वेळी डोळ्यांनी वाचणे आणि तोंडाने बोलणे किंवा ते शब्द उच्चार करणे यामुळे जी एकाग्रता होईल अशी एकाग्रता ह्या तपाचे फ़ळ मिळवण्यासाठी उपयोगी आहे.

आपल्या सोयी साठी पहील्या दिवसाचे रुक्मिणी स्वयंवर वाचन ७-१-२-७ याची प्लेलीस्ट इथे आहे त्याची लिंक खाली डिस्क्रीप्शन मधे येईल या प्रमाणे नऊ प्ले लीस्ट तयार करण्यात येतील ज्यामुळे हे १८ अध्यायांच्या व्हिडीओ पैकी ७-१-२-७ हे व्हिडीओ आपल्याला शोधत बसण्याची आवश्यकता नाही. या प्रमाणे जर आपण वाचन केले तर वाचन करणे सोपे होईल.

आपण फ़क्त या एका व्हिडीओची लिंक आपल्या मोबाईलवर ठेवायची किंवा ९ लिंक कॉपी करुन आपल्या कडे ठेवल्या तर त्या दिवसाचे वाचन शोधणे सोपे होईल.

आपल्या सोयी साठी मी प्रत्येक दिवसाच्या  वाचनासाठी किती वेळ लागतो हे या व्हिडीओ मधे लिहून देत आहे.



पहिल्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१-२-७ https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoWe-sbjVjKIvu7i6m-JZGBK

दुसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-३-४-७  https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoUoXHogfM_ylrkDdh0foZPU

तिसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-५-६-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoVj8iQAmdaxq9tN8G7O-XeK

चवथ्या दिवसाचे वाचन अध्याय ७-७-८-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXBXnkt0BAleOF1zjq6abIK

पाचव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-९-१०-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXO50XmY_XEhfMmuaIt7-aU

सहाव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-११-१२-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUB2l9gNRe_3FtYJFjN-R5a

सातव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१३-१४-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUASojevD37Foa_8XHIWQYH

आठव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१५-१६-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXbDNsvpov9epEjp1GA_xDr

नवव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१७-१८-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoV5IumW4wwx8WI7utRmfJO6


इतका वेळ आपण आपल्या दिवसभरात काढून दिवसभराचे वेळापत्रक आखू शकाल. थोडक्यात मराठी वाचायला वेळ लागतो यासाठी हे वाचन न लांबता इतक्या वेळात पुर्ण होते हे समजले की आपण नोकरी करत असाल तर वेळापत्रक बिघडण्याचे कारण रहाणार नाही.

यापुढे जाऊन हे वाचन करताना आपल्याला काय अडचणी येत आहेत ते कळवा म्हणजे त्या अडचणींवर कशी मात करायची हे समजेल. व त्यावर पर्याय शोधून काढता येईल.

आपल्याला हा संकल्प यशी रित्या पुर्ण होण्यासाठी शुभेच्छा आणि विवाह व्हावा यासाठी सुध्दा शुभेच्छा आणि शुभाअशिर्वाद