Thursday, November 7, 2019

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहे
शुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.

थोडक्यात रवि आणि बुध शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षल
आणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.

या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( मेष ते कन्या राशी साठी )






















तुळ रास

आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबर पासून धनु राशीत जाणार आहे. २४ तारखेला शुक्र गुरु यांची युती आहे. तिसर्या स्थानी होणारी देवगुरु आणि राक्षसगुरु यांची युती आपल्याला आपल्या लेखनामुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने प्रसिध्दी मिळण्याचे योग आहेत. एका बाजूला प्रसिध्दी योग असताना दुसर्या बाजूला लेखनावर टीका सुध्दा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काय उत्तर द्यायचे याची तयारी झालेली असावी.

११ डिसेंबरला होणारी शुक्र शनि युती शिक्षण क्षेत्रात काम करणार्या लोकांच्या साठी किंवा कमर्शियल आर्ट मधे पेन्सील वर्क, ब्लॅक मेटल वर काम करणार्या लोकांना काही संधी घेऊन येणारी आहे. ही युती म्हणजे मोठा राजयोग आहे. यामुळे तुळ राशीच्या काही लोकांना संधी उपलब्ध होतील. १३ डिसेंबरला होणारी शुक्र प्लुटो युती मात्र जननिंदा घेऊन येणारी आहे. एकाबाजूला सन्मान, संधी तर दुसर्या बाजूला जननिंदा असे विचीत्र ग्रहमान या महिन्यात काही तुळ लग्नाच्या लोकांना अनुभवास येईल.

वृश्चिक रास

आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर वृश्चिक राशीत असणार आहे. आपला एखाद्या गोष्टीचा नको तेव्हडा आग्रह आपल्याला अडचणीत तर आणत नाही ना या कडे लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्यात आपल्याला वैवाहीक जोडीदाराच्या माध्यमातुन काही धनलाभ होण्याचे योग आहेत. काही वृश्चिक लग्नराशींच्या लोकांना पुर्वी झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई सुध्दा मिळेल असे योग आहेत.

या महिन्यात आपल्या घरी कौटुबीक स्नेह संमेलन भरेल. सर्वच स्नेही गोड बोलतातच असे नाही. आपल्याच घरी येऊन, जेऊन खाऊन आपल्याला वाईट बोलून जाणारे स्नेही या महिन्यात असा स्नेह मेळावा झाल्यास दिसतील. हा त्यांचा स्वभाव आहे असे समजून त्या कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कारण ते काही बोलले म्हणजे ते खरे असते आणि त्यामुळे नुकसान होतेच असे नाही.

धनु रास :

आपल्या राशीचा मालक गुरु जो गेले वर्षभर बाराव्या स्थानी होता तो आता रास बदलून धनु राशीत आल्याने आपण जे काम करता त्यात आपले विचार, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल. अनेकदा ग्रहस्थिती अनुकूल नसल्याने काही घडवून आणणे जमले नसेल तर २७ मार्च २०२० पर्य्ंतचे पुढील पाच महिने आपल्या हाताशी आहेत.

आपल्या राशीत होणारी शुक्र गुरु युती आपल्याला लाभ देऊन जाणार आहे. हाताखालच्या लोकांनी केलेल्या कामामुळे असे घडत असेल तर मात्र याची जाणीव ठेऊन कृतज्ञता व्यक्त करायला आपण विसरणार नाही हे पहा. कोणा मित्रांच्या संसारातला गृहकलह समोर येईल आणि तो मार्गी लावताना आपले हात पोळणार नाहीत इतके अंतर ठेऊन हे काम करा,

या महिन्यात बाराव्या स्थानी बसलेला मंगळ काही गुप्त चिंता, गुप्त खर्च देईल. हे उघड करता व्यवस्थित मॅनेज करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल.

मकर रास :

आपल्या राशीचा मालक शनि अजुनही बाराव्या स्थानी आहे. जानेवारीत तो मकर राशीत येणार आहे. आपल्या संतती संदर्भात खास करुन संततीच्या नोकरीच्या ठिकाणी उद्भवलेल्या प्रश्नामुळे काही चिंता लागून राहील. काही खर्च सुध्दा किंवा प्रवास यामुळे या महिन्यात करणे आवश्यक ठरेल.

या महिन्यात लाभ स्थानी असलेला मंगळ आपले उत्पन्न वाढवेल किंवा एखादा उत्पन्नाचा नविन मार्ग मिळवून देईल यामुळे खर्च असला तरी मॅनेज होईल.  आपल्या नोकरीच्या ठिकाणी हाताखालचे वरिष्ठ सुध्दा आपण अडचणीत असाल तर मोलाचा सल्ला देतील. यामुळे आपण काही कठीण परिस्थिती या महिन्यात आली तरी हाताळू शकाल.

कुंभ रास:

आपल्या राशीला संपुर्ण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिने चांगले जाणार आहेत. अनेक कामे मार्गी लागतील. अनेक प्रकारचे लाभ जसे आपल्या मुदतठेवी वरचे व्याज, गुंतवणूकीपासून फ़ायदा या काळात अपेक्षीत आहेत.

२४ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरु युती मुळे आपले वरिष्ठ काही विशेष लाभ आपल्याला मिळवून देतील. २१ नोव्हेंबरला लाभ स्थानात येणारा शुक्र कुंभ लग्नाला राजयोग कारक असल्यामुळे १३ डिसेंबर पर्यंत प्रॉपर्टी मधून लाभ असो की अन्य अनेक लाभ आपल्या पर्यंत पोचोवणार आहे.

याच काळात २१ नोव्हेंबर नंतर आपल्या बुध्दीमत्तेची चमक दिसणार आहे. आपण बुध्दीबळ खेळत असाल किंवा कौन बनेगा करोडपती सारख्या बुध्दीचे प्रदर्शन करण्याच्या स्पर्धा असतील, आपल्याला लोकप्रियता मिळवून देणार आहे. डिसेंबर २०१९ ला होणारा चंद्र आणि नेपच्युन योग कुंभ राशीच्या लोकांचा मुड घालवणारा असेल. हा एक दिवस सोडला तर कुंभ राशीला हा महिना स्मरणात राहील असाच असेल.

मीन रास :

आपल्या राशीचा मालक दशमस्थानी आल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ होण्यास सुरवात होईल याची चुणूक या महिन्यातच दिसेल. आपल्या नोकरीतले किंवा व्यवसायाचे कार्यक्षेत्र मोठे झाल्यामुळे ह्याचे व्यवस्थापन कसे करायचे या कडे सुरवाती पासून लक्ष द्यावे लागणार आहे. २७ मार्च २०२० पर्यंत कामाचा बोजा वाढत जाणार आहे.

इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारे, भुवैज्ञानीक, बोअर वेल खोदणारे, जमिनीतून बाहेर आलेली रत्ने घडवणारे, विकणारे यांना या महिन्यात प्रचंड काम करावे लागणार आहे. यातून फ़ायदा होणारच आहे हे विसरू नये. जे लोक परदेशस्थ कंपनीची कामे करतात त्यांनाही भरपुर काम मिळणार आहे. एकंदरित मीन लग्नराशीच्या लोकांना आलेली निराश या महिन्यात दुर होऊन प्रगतीचा आलेख उंचावत जाण्यास आता सुरवात होणार आहे. आपल्याला सुध्दा हा महिना स्मरणात राहील असाच असणार आहे.

शुभंभवतु

No comments:

Post a Comment