नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे
सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७ तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य
सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहे
शुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन ५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.
थोडक्यात रवि आणि बुध व शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षल
आणि नेपच्युन आहे त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.
या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.
मेष रास:
आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर तुळ राशीत असल्यामुळे "मुग गिळून रहाणे" ह्या शब्द प्रयोगाचा अनुभव महिनाभर येणार आहे. तुमचा स्वभाव उसळून प्रतिक्रिया देण्याचा असला तरी अशी प्रतिक्रिया आपण देऊ शकणार नाही. शत्रु सोबत व्यावहारीक तडजोड आपण करणार आहात. कदाचित याही मुळे शत्रुबाबत सुध्दा आपल्याला प्रतिक्रिया देण्याची संधी ५ डिसेंबर पर्यंत नाही.
२४ नोव्हेंबरला होणारी मंगळ हर्षल प्रतियुती तुमच्या आयुष्यात एखादी नको असलेली घटना घडवणार नाही ना याबाबत सावध असावे. किमान या दिवशी वाहनावर असाल तर डोक्याला हेल्मेट किंवा सिट बेल्ट, वेग कमी आणि सावधानता बाळगल्यास अप्रिय घडू नये.
२१ नोव्हेंबर २०१९ पासून पुढे महिनाभर आपल्या वैवाहीक जोडीदाराला चांगले दिवस येणार आहेत. जोडीदार खुष तर आपणही खुष असे म्हणण्याचा आपला स्वभाव नाही. आपण आपली स्पेस, आवडी निवडी याबाबत आग्रही असला तरी ही बाब आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात चांगले काही घडत असेल तर याबाबत आनंद व्यक्त करण्याची आहे हे सांगायला नको.
वृषभ रास:
आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबरला धनु राशीत जाणार आहे. धनु रास तुमच्या राशीकडून नेमकी आठवी असते. यामुळे महिनाभर तुम्हाला चेक आणि मेट अशी अवस्था असेल. तशात २४ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरुची युती आठव्या स्थानी झाल्यावर इतर राशींना जी चांगली फ़ळे मिलणार आहेत अशी तुम्हाला मिळणार नाहीत. आपण डॉक्टर असाल तर मात्र एखादया निष्णांत डॉक्टर कडून आपल्याला उत्तम टीप्स मिळतील.
शुक्र आणि शनिची युती ११ डिसेंबरला होत आहे. अनेकांना हा दिवस स्मरणात राहील असा असेल. आपण आणि आपले वरिष्ठ जर खोलात जाऊन काही शोध घेत असाल तर नक्कीच आपल्या कलेची चुणूक त्यांना दिसेल. महिन्याच्या शेवटी होणारी प्लुटो आणि शुक्र युती अनेक तरुणांचा ब्रेक अप करणारी असेल.
मिथुन रास :
आपल्या राशीचा मालक बुध तुळ राशीत महिन्याच्या सुरवातीपासून वक्री असणार आहे. २१ नोव्हेंबरला तो एकदा मार्गी झाल्यावर तुम्हाला तुमचा सुर गवसणार आहे. शाब्दीक फ़टकेबाजीला जणू कित्येक दिवस बांधून ठेवले होते त्याचे पारणे अनेकांशी किती बोलू या पध्दतीने तुम्ही फ़ेडणार आहात. नेहमीच्या हास्य विनोदाने पुन्हा वातावरण हलके फ़ुलके करुन टाकणार आहात.
५ डिसेंबरला बुध वृश्चिक राशित जाईपर्यंत महत्वाची कामे मार्गी लावा. अनेक तरुणांना २४ नोव्हेंबरला प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस आहे असे वाटते. इथे जोडीदारच तुम्हाला प्रपोज करणार असल्यामुळे प्रपोज करण्यासाठी वातावरण निर्माण करा. जोडीदाराला आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल असे वातावरण ठेवा म्हणजे महिन्याच्या शेवटी कटू प्रसंग येणार नाहीत.
कर्क रास :
या महिन्यात
संततीच्या डिमांड वाढणार आहेत. दिवाळी
होऊन गेली तरी हे
पाहीजे ते पाहिजे असे
चित्र या महिन्यात दिसेल. बाल
हट्ट पुरवला पाहिजे म्हणून
तरतुद करा. या महिन्यात
२१ तारखेनंतर आपल्याला
स्वत: चे आजारपण यामुळे
किंवा मित्राने केलेल्या
फ़सवणुकी मुळे खर्च वाढू
शकेल. हे कमी की
काय २१ तारखेनंतर मातेशी
वाद विवाद वाढू शकतात. आपण
खरेदी केलेल्या घरगुती
वस्तु खराब निघाल्याने आपल्याला
कस्टमर केअर बरोबर वाद
विवाद करुन वस्तू बदलून
आणण्यासाठी परिश्रम पडतील.
विद्यार्थी
वर्गाला २१ नोव्हेंबर नंतर
अभ्यास कसा करावा याचे
तंत्र किंवा एखाद्या विषयाचे
मर्म समजेल जेणे करुन
डिसेंबर मधे एखादी परिक्षा
असेल त्यात यश मिळेल. एकंदरीत
विद्यार्थी वर्गाला हा महिना
अभ्यास किंवा परिक्षामधे यश
या दृष्टीने चांगला
जाईल.
सिंह रास :
आपल्या राशीचा
मालक रवि महिनाभर चवथ्या
स्थानी असणार आहे. ही अवस्था
जंगलच्या राजाला पिंजर्यात बांधुन
ठेवल्याची आहे. पण या
निमीत्ताने घरच्या मंडळींना वेळ
देता येईल, त्यांच्या समवेत
सुख वार्ता आणि उत्कृष्ट
घरच्या जेवणाचा तसेच वामकुक्षी
अर्थात पॉवर नॅप चे
योग या महिन्यात वारंवार
येतील.
या
महिन्यात नोकरी/व्यवसायात आपल्या
हाताखालच्या लोकांना नविन कामाची
पध्दत असो की अन्य
काही, फ़ॉर्मल ट्रेनिंग च्या
माध्यमातून शिकवण्याची संधी
आपल्याला मिळणार आहे. हीच एक
संधी असते की आपण
लोकांना आपल्या किंवा व्यवसायाच्या
दृष्टीने अपेक्षा समजाऊन सांगण्याची.
हे काम आपण उत्तम
करुन हाताखालच्या लोकांना
आपलेसे कराल.
आपण करत असलेले प्रेझेंटेशन
मुळे काही विरोधाभास निर्माण
होत नाही ना याची
मात्र काळजी घ्या. अनेकदा सरकारी
फ़तवे अश्या controversy
मुळे अर्थहीन होतात.
कन्या
रास:
आपल्या
राशीचा मालक बुध २१ नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीत वक्री असणार आहे. त्यामुळे २१ तारखेपर्यंत आपले आराखडे, पैसे नियोजनातली
आकडेमोड मनाप्रमाणे होणार नाही. काहीतरी चुकत आहे असे वाटत राहील.
२१ तारखेनंतर मात्र घोळ समजेल आणि हायसे वाटेल. बॅंक किंवा फ़ायनान्स क्षेत्रातील लोकांना सुध्दा २१ तारखेनंतर थोडी उसंत मिळेल.
कन्या
राशीच्या लोकांना या महिन्यात लिखाणाची आवड असेल तर भरपुर लिखाण एकटाकी हातावेगळे करता
येईल. आजकाल सोशल मिडीयावर नियम फ़ार कडक होत असल्यामुळे
धाडसाने काही लिहून अंगाशी येणार नाही ना येवढे पहा.
आपल्याला या महिन्यात एखाद्या आर्थिक विषयावर किंवा धार्मिक विषयावरील तज्ञ व्यक्तीचे
मार्गदर्शन मिळण्याचा योग बाहेर कुठेही न जाता एक तर दुरदर्शन वर मिळेल किंवा अशी व्यक्ती
चालून घरी येईल. दिवाळी संपली असली तरी ज्ञान हीच दिवाळी असा अनुभव येईल.
No comments:
Post a Comment