Monday, December 16, 2019

विवाहासंदर्भात तीन चुकीच्या प्रथा

मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या शिवाय सिंहस्थ म्हणजे जेंव्हा सिंह राशीत गुरु असतो तो कालावधी विवाहासाठी वर्ज मानला गेलेला आहे परंतु सिंह राशीत गुरु जाण्यासाठी अजून ८ वर्षे कालावधी आहे तर पितृपक्ष हा कालावधी विवाहाच्या कामासाठी अयोग्य मानला आहे. यावर चर्चा आपण पुन्हा योग्य वेळी करु.

आज आपण चर्चा करु पौष महिन्यात विवाह करु नये किंवा विवाहसंदर्भातले सर्वच कार्येक्रम जसे स्थळांच्या संदर्भात चर्चा, वधू - वरांच्या नातेवाईकांच्या भेटी किंवा विवाह ठरवणे या संदर्भातल्या प्रथा.

पुष्य नक्षत्रात चंद्र असताना विवाह करण्यास योग्य नक्षत्र नाही असे मानून विवाह केला जात नाही. ह्या पुष्य नक्षत्राचा आणि पौष महिन्याचा काही संबंध नाही.  पौष महिन्याला खरमास असेही म्हणतात. काही लोक याला मलमास असेही म्हणतात. खर याचा अर्थ गाढव. रवि जेंव्हा धनू राशीत असतो तेंव्हा रविला शक्ती नसते असेही म्हणतात. जेंव्हा रवि बलवान नसतो तेंव्हा कोणत्याही कार्यात अपयश येण्याची शक्यता असल्यामुळे १७ डिसेंबर ते १३ जानेवरी या काळात येणार्या पौष महिन्यात धार्मिक विधी करु नये असा प्रवाह आहे.

तांत्रिक दृष्ट्या रविला शक्ती नसते असे म्हणणे ही गैर आहे. धनू ही अग्निराशी आहे. गुरु हा शनिचा मित्र आहे त्यामुळे रविला शक्ती नसते तांत्रिक दृष्ट्या न पटणारे आहे. पण ही एकदा प्रथा पडली म्हणजे अनेक पिढ्या चुकीचे बिंबवले जाते.

आजकाल विवाह विवीध कारणाने लांबत आहेत अश्यावेळी एक महिना विवाह विषयक चर्चा सुध्दा करायची नाही हे बरोबर नाही. त्यातुनही मुहूर्त शोधणारे आणि जाहीर करणारे पंचांग जर विवाहाचे मुहूर्त पौष महिन्यात देते तर आपण असे मुहूर्त नाकारणे बरोबर नाही असे माझे मत आहे.

दातेपंचांगकर्ते यांनी सुध्दा काही वर्षांपुर्वी लेख लिहून ही प्रथा अनावश्यक असल्याचे सांगीतले होते.यास्तव पालकांनी विनाकारण भिती बाळगू नये व विवाहाची बोलणी पौष महिन्यात सुरु ठेवावी व विवाह मुहूर्त असताना विवाह संपन्न करावेत. 

No comments:

Post a Comment