नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी
लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे
राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण
पणे १५- १६-१७ तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून
दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी
अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ डिसेंबरला २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २५ डिसेंबरला ला धनु राशीत जाणार आहे.
मंगळ २५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र ८ जानेवारी २०२० ला कुंभ राशीत जाणार
आहे.
धनु राशीत संपुर्ण महिन्यात चंद्र, बुध, रवि या
या महिन्यात येणारे ग्रह तसेच आधीपासून धनु राशीतच बसलेले
गुरु, शनि, केतू आणि प्लुटो यामुळे धनु राशीत सात ग्रह येतील. २५ डिसेंबर २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर रोजी असलेले कंकणाकृती सुर्यग्रहण या बाबतचा लेख नुकताच प्रसिध्द
झाला आहे.
जानेवारी २०२० पासून नविन वर्ष सुरु होते. यासाठी वार्षिक राशी भविष्य मी आधीच
प्रसिध्द केले आहे.
त्याच्या
ब्लॉगवर असलेल्या लिंक आणि युट्युब वरच्या लिंक खाली पहा.
वार्षिक
राशीभविष्य २०२०
मेष
-वृषभ- मिथुन https://youtu.be/b97dxZOyD_g
कर्क
-सिंह-कन्या https://youtu.be/K32EZmPdVZc
तुळ-
वृश्चिक - धनु https://youtu.be/PUCLnZmjx40
मकर-कुंभ-मीन https://youtu.be/ZheFl5O3Xmc
आता राशीनिहाय
१६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नराशीकडून
पहावे. लग्नरास माहित नसल्यास चंद्रराशीकडून पहावे.
मेष रास:
आपल्या राशीचा
मालक मंगळ २५ डिसेंबर
२०१९ पर्यंत तुळ राशीत
आहे.
काही जणांना २५ डिसेंबर
२०१९ नंतर आरोग्याच्या समस्येला
तोंड द्यावे लागेल. आपल्याला हा
महिनाभर प्रसिध्दी मिळण्याचे
योग आहेत. खेळाडुंना अशी
प्रसिध्दी सहज मिळेल. विद्यार्थी आणि
कलाकारांना सुध्दा महिनाभर यश
मिळेल. नोकरीत आपल्या हाताखालचे
लोक आपल्या वरिष्ठांबरोबर काय
चर्चा करतात याचा अंदाज
घ्या.
आपला वैवाहीक
जोडीदार या महिन्यात ८
जानेवारी नंतर पगारवाढ किंवा
व्यवसाय करत असेल तर
त्यातून फ़ायदा झाल्याची बातमी
देईल. आपल्याला स्वत:ला सुध्दा अकस्मात धनलाभ लॉटरी किंवा अन्य मार्गाने होण्याची शक्यता या महिन्यात आहे.
आपली निर्माण केलेली कोणतीही कला आपल्याला कॉपी राईट म्हणून काही धन देऊन जाईल.
वृषभ
रास :
अनेक
दिवस एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत असाल तर ती गोष्ट ८ जानेवारी २०२० नंतर आपल्याला
मिळेल. या महिन्यात आरोग्य ठीक रहाणार नाही असा अनुभव काही जणांना येईल. याचे कारण
नेहमीची डायबेटीस किंवा तत्सम दुखणी नसून प्रतिकार शक्ती कमी होण्याने असेल. २५ डिसेंबर
२०१९ नंतर अनेक वृषभ राशीच्या लोकांना उरलेला महिना फ़ारच रोमॅंटीक झाल्याचा भास होईल.
ज्यांना कुणालातरी प्रपोज करावे असे वाटत असेल तर २५ तारखे नंतर अशी संधी घ्या.
अनेक प्रेमी जनांना प्रेमविवाह होण्यासाठीच्या अडचणी दुर होताना दिसतील. एकंदरीत विवाह
झाला असेल वा नसेल, तुमच्या जीवनात हा थंडीचा सिझन गुलाबी रंग घेऊन
आला आहे याची जाणीव करुन देणारा हा महिना असेल.
मिथुन रास
:
या महिन्यात
२५ तारखेनंतर आपला
विवाह झालेला नसल्यास त्या
संदर्भात बोलणी सुरु असतील
तर निर्णय होईल. या महिन्यात
भावंडे काही चांगली बातमी
देतील किंवा गरज असल्यास
मदत सुध्दा करतील. अनेकदा एखाद्या
व्यक्तीने आपले ऐकावे असे
वाटत असते परंतु आपली
शब्द रचना योग्य नसल्यामुळे
किंवा योग्य वेळ नसल्यामुळे
याचा परिणाम साधत नाही. डिसेंबर
महिन्यात २५ तारखेपर्यंत उत्तम
शब्दरचना करुन योग्य वेळ
साधून आपण संवाद केल्यास
ज्याला इंग्रजीत पॅराडाईम
शिफ़्ट किंवा मराठीत मत
परिवर्तन म्हणावे असा परिणाम
नक्की साधेल.
२५
तारखेनंतर आपल्या घनिष्ट मित्रांशी
दुरावा निर्माण होण्याचे प्रसंग
येतील. असे घडू नये
असे वाटत असेल तर
फ़क्त शब्द हे शस्त्र
आहे असे नाही तर
मित्रांच्या बाबतीत आपली प्रत्येक
कृती विचारपुर्वक करा. जे
कलाकार आहेत त्यांच्या कलाकृतीला
या महिन्याच्या अखेरीला
प्लॅटफ़ॉर्म मिळेल. या निमीत्ताने
प्रसिध्दी योग ही येतील.
------------------
मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.
या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.
या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.
https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html
------------------
मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.
या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.
या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.
https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html
No comments:
Post a Comment