Sunday, December 8, 2019

१६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य ( तुळ- वृश्चिक - धनु )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ डिसेंबरला २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २५ डिसेंबरला ला धनु राशीत जाणार आहे.
मंगळ २५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र ८ जानेवारी २०२० ला कुंभ  राशीत जाणार आहे.

धनु राशीत संपुर्ण महिन्यात चंद्र, बुध, रवि या या महिन्यात येणारे ग्रह तसेच आधीपासून धनु राशीतच बसलेले गुरु, शनि, केतू आणि प्लुटो यामुळे धनु राशीत सात ग्रह येतील. २५ डिसेंबर २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर रोजी असलेले कंकणाकृती सुर्यग्रहण या बाबतचा लेख नुकताच प्रसिध्द झाला आहे.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post.html

जानेवारी २०२० पासून नविन वर्ष सुरु होते. यासाठी वार्षिक राशी भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे.

त्याच्या ब्लॉगवर असलेल्या लिंक आणि युट्युब वरच्या लिंक खाली पहा.
https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_54.html  ( मेष ते कन्या रास )

https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_97.html  (  तुळ ते मीन रास )
वार्षिक राशीभविष्य २०२०
मेष -वृषभ- मिथुन https://youtu.be/b97dxZOyD_g
कर्क -सिंह-कन्या https://youtu.be/K32EZmPdVZc
तुळ- वृश्चिक - धनु https://youtu.be/PUCLnZmjx40
मकर-कुंभ-मीन https://youtu.be/ZheFl5O3Xmc

आता राशीनिहाय १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. लग्नरास माहित नसल्यास चंद्रराशीकडून पहावे.

तुळ रास:


आपल्या राशीला चांगले सुखाचे दिवस जानेवारी २०२० पर्यंत आहेत. उत्तम घरचे जेवण आणि सुखाने झोप घेण्याचे योग कमी असतात परंतु आपल्या राशीला काही कारणाने अशी संधी मिळेल. चांगले वाहन सौख्य मिळून जवळचे किंवा लांबचे प्रवास आनंदात होतील. जानेवारी २०२० नंतर मुलांच्या संदर्भात चांगली बातमी समजण्याचे योग येतील किंवा तुम्हाला मुलांचे सुख लाभावे असे मुलांचे वर्तन असेल.

२५ डिसेंबर नंतर व्यापार/व्यवसाय करत असाल तर मोठे यश मिळून अपेक्षे पेक्षा जास्त पैसे मिळतील. व्यवसायात वृध्दी होईल. जवळच्या प्रवासाचे देवदर्शनाचे योग २५ डिसेंबर नंतर येतील. काही जणांना परदेश गमनाचा योग सुध्दा २५ डिसेंबर २०१९ नंतर आहे. एकंदरीत दु: व्हावे अशी कोणतीही गोष्ट या महिन्यात अपेक्षीत नाही.

वृश्चिक रास :

अनेक प्रयत्न करुन हुलकावणी देत असलेले कामातले यश २५ डिसेंबर नंतर सहजपणे मिळेल. यासाठी काही गुप्त प्रयत्न करावे लागतील. २५ डिसेंबर नंतर सेव्हींग अकाऊंटला जमा झालेले पैसे कोणत्या मार्गाने गुंतवावे यावर पर्याय शोधून काढावा लागेल. नेहमीच्या नोकरी व्यवसायाशिवाय वारसा हक्काने, लॉटरी ने किंवा अन्य मार्गाने सुध्दा २५ डिसेंबर २०१९ नंतर पैसे येतील. जास्त पगाराची नविन नोकरी सुध्दा या महिनाभरात मिळण्याचे योग संभवतात,

जानेवारी २०२० पर्यंत लहान प्रवास चांगले होतील यानंतर मात्र प्रवास होणार नाहीत किंवा पुढे काही दिवस प्रवासाची आवश्यकता भासणार नाही. कदाचीत वर्क फ़्रॉम होम यामुळे किंवा अन्य कारणामुळे असे घडेल. जानेवारी नंतर आपल्या घरात असण्याने काही कटकटी निर्माण होणार नाहीत याबाबत जागरुक असावे अन्यथा आपल्या घरचे लोक आपल्यावर नाराज होतील.

धनु रास:

नुकताच गुरु धनु राशीत गेल्यामुळे सर्वकाही सुखदायी असल्याचा प्रत्यय येत असेल. धनु राशीत होणारे ग्रहण यामुळे काही अप्रिय घटना सोडता हा गुरु एकंदरीत महिना वाईट गेला असे म्हणण्याची वेळ येऊ देणार नाही. या महिन्यात काही विशेष धार्मिक कर्म आपल्या हातून घडेल. पुजेचा मान मिळेल. २७ डिसेंबरला होणारी रवि-गुरु युती अध्यात्म दृष्टीने लाभदायक असेलया महिन्यात २५ डिसेंबर नंतर तिर्थयात्रा घडण्याचे योग आहेत.

जानेवारी २०२० पर्यंत नोकरी किंवा अन्य मार्गाने बरेच पैसे सेव्हींग अकाउंटला खर्च वजा जाऊन शिल्लक रहातील. यासाठी या महिन्यात यशस्वी व्यापार/ व्यवसाय या मार्गाने आपण उत्तम पैसे मिळवाल. महिन्याच्या शेवटी बुध शनि, प्लुटॊ यामुळे मनाविरुध्द घटना घदतील स्पार्क उडतील पण ते यशस्वी पध्दतीने आपण नक्कीच हाताळाल.

                           --------------

मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html

1 comment:

  1. Welcome Bonus & Casino Credit - KTNV
    Welcome Bonus 충주 출장샵 & 아산 출장마사지 Casino Credit - Learn 익산 출장마사지 how to qualify for this welcome bonus from our casinos in our online Deposit, withdraw 창원 출장안마 your 시흥 출장샵 first casino deposit of at least $10 using

    ReplyDelete