Sunday, December 8, 2019

१६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य ( कर्क -सिंह-कन्या )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ डिसेंबरला २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २५ डिसेंबरला ला धनु राशीत जाणार आहे.
मंगळ २५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र ८ जानेवारी २०२० ला कुंभ  राशीत जाणार आहे.

धनु राशीत संपुर्ण महिन्यात चंद्र, बुध, रवि या या महिन्यात येणारे ग्रह तसेच आधीपासून धनु राशीतच बसलेले गुरु, शनि, केतू आणि प्लुटो यामुळे धनु राशीत सात ग्रह येतील. २५ डिसेंबर २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर रोजी असलेले कंकणाकृती सुर्यग्रहण या बाबतचा लेख नुकताच प्रसिध्द झाला आहे.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post.html

जानेवारी २०२० पासून नविन वर्ष सुरु होते. यासाठी वार्षिक राशी भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे.

त्याच्या ब्लॉगवर असलेल्या लिंक आणि युट्युब वरच्या लिंक खाली पहा.
https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_54.html  ( मेष ते कन्या रास )

https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_97.html  (  तुळ ते मीन रास )
वार्षिक राशीभविष्य २०२०
मेष -वृषभ- मिथुन https://youtu.be/b97dxZOyD_g
कर्क -सिंह-कन्या https://youtu.be/K32EZmPdVZc
तुळ- वृश्चिक - धनु https://youtu.be/PUCLnZmjx40
मकर-कुंभ-मीन https://youtu.be/ZheFl5O3Xmc

आता राशीनिहाय १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. लग्नरास माहित नसल्यास चंद्रराशीकडून पहावे.

कर्क रास :


कर्क राशीचे लोक भावनाशील असतात. अनेकांना सुचक स्वप्ने पडतात या दृष्टीने २२ डिसेंबर २०१९ आणि १० जानेवरी २०२० या तारखांना पडलेली स्वप्ने लिहून ठेवा आणि मी सांगतो त्याचा अनुभव घ्या.

हा महिना खास नोकरदारांच्या साठी चांगला असून नोकरदार माणसांना या महिन्यात आपले काम वरिष्ठांना आवडते आहे याबाबत समजेल. काही वेळा वरिष्ठ हे आपल्याला बोलत नाही पण इतरांना बोलून दाखवतात किंवा त्यांच्या कृतीतून हे दिसते. भावंडांकडे काही महत्वाचे कौटूंबीक काम असल्यास ते २५ डिसेंबर २०१९ पुर्वी करा. कदाचीत २५ डिसेंबर नंतर गैरसमज आणि त्यातून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

हा महिना जसा नोकरदारांच्या कष्टाचे कौतूक किंवा चीज होईल असा आहे तसाच तो व्यवसाय करणार्या लोकांच्या साठी चांगला आहे. या महिन्यात व्यवसाय वाढीचे योग जानेवारीच्या आधी येतील. जानेवारी नंतर दोन नंबरचे व्यवसाय करणार्या लोकांना चांगले लाभ होतील.

सिंह रास:

आपल्या राशीचा मालक रवि पंचमस्थानी धनु राशीत महिनाभर मुक्काम करणार आहे. सरकारी नोकरांचा ताण जरा कमी होईल आणि कला क्रिडा या विषयात आनंद मिळेल. कला क्रिडा खात्यात काम करणार्या लोकांना, स्टॅटीस्टीक विषयात काम करणार्या लोकांना हा महिना चांगला जाईल. सध्याचा काळ सहल /प्रवासास योग्य असल्यामुळे अनेकांना सहल तिर्थयात्रा एकत्र करण्याचा आनंद लाभेल.

सिंह राशीचे लोक या महिन्यात करमणूकीसाठी वेळ देतील पैसे ही खर्च करतील. नाटक सिनेमा क्षेत्रात काम करणार्या सिंह राशीच्या लोकांना नविन काम मिळेल. कथा विस्तार करण्यासाठी सुचेल.

नोकरदार लोकांना वरिष्ठांच्या नजरेस सहज पडेल असे काम करण्याचा योग या महिन्यात आहे. तारखेनंतर सार्वजनीक जीवनात काम करणार्या लोकांना प्रवास घडेल, स्वकर्तुत्वाने पुढे येण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल.

कन्या रास:

२५ तारखेपर्यंत सारखा प्रवास करावा लागला असेल तर कन्या राशीच्या लोकांना काही ना काही कारणाने २५ तारखेनंतर प्रवास थांबेल. या महिन्यात करमणुक होण्याचे योग आहेत. संतती साठी पैसे बाजूला काढून ठेवा. नजीकच्या काळात हे पैसे लागू शकतात. विद्यार्थी वर्गाला जानेवारी पर्यंत परिक्षा असेल तर चांगले यश लाभेल.

कन्या राशीच्या लोकांनी महत्वाचे काम इतरांच्या सल्याने करायचे ठरवले असल्यास या महिन्याच्या उतरार्धात हा सल्ला किती खात्रीलायक आहे हे आपल्या बुध्दीने पहावे. खात्री असेल तरच हा सल्ला आमलात आणावा.

या महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी कानाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. थंड हवा कानाला लागून कान ठणकणे किंवा खुप जास्त त्रास झाल्यास व्हर्टीगो सारख्या रोग होणार नाही यासाठी काळजी घ्यावी.
                                                    ---------


मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html

No comments:

Post a Comment