Thursday, December 5, 2019

२५ डिसेंबरची २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर २०१९ चे सुर्यग्रहण

अमावस्या आली की अनेकांना अस्वस्थ करते. या महिन्यात येणारी अमावस्या अनेक ज्योतिषांना अस्वस्थ करत आहे. याचे कारण या महिन्यात  २५ तारखेला दुपारी सुरु होणारी धनु राशीत मुळ नक्षत्रात होणारी अमावस्या आणि याच वेळी धनु राशीत चंद्रासह असणारी सात ग्रहांची गर्दी.

धनु राशीत रवि १६ डिसेंबर २०१९ ला जाणार आहे. त्या आधीच धनु राशीत गुरु नोव्हेंबरला गेलेला आहे. केतू शनि आणि प्लुटॊ तिथे आहेतच शिवाय २५ तारखेला बुध आणि चंद्र यांचे आगमन धनु राशीत होऊन तिथे सात ग्रहांचे संमेलन भरणार आहे.

२५ डिसेंबरची २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर २०१९ चे सुर्यग्रहण















सात ग्रहांचे संमेलन सोबत अमावस्या आणि सुर्यग्रहण असे योग आहेत. यात धनु राशीला सुर्यग्रहणाचे दातेपंचांगात अशुभ फ़ल दिले आहे. पण यामुळे घाबरुन जाण्याचे कारणच नाही.

माझी स्वत:ची रास धनु आणि जन्मनक्षत्र मुळ आहे. याही पुढे जाऊन माझ्या जन्मकुंडलीत ज्या अंशावर चंद्र आहे तिथेच अमावस्या सुर्यग्रहण घडणार आहे. माझ्या स्वत:च्या बाबतीत जे घडेल ते अगदीच अनपेक्षीत नसेल असे वाटते.

या सुर्यग्रहणात रवि चंद्र यांची युती होणार असून जवळच केतू असल्यामुळे हे ग्रहण असणार आहे. यामुळे रवि केतू आणि चंद्र केतू योग हे अशुभ योग होणार आहेत.

रवि राजाचा, राजकारणाचा, आरोग्याचा, कारक असल्यामुळे राजकारण, परराष्ट्र धोरण या सर्वावर त्याचे परिणाम दिसणार आहेत. चंद्र प्रजेचा कारक असल्यामुळे याचे काही परिणाम जनतेला ही भोगावे लागणार आहेत. रवि केतू युती मुळे राजकारणात आरोप प्रत्यारोप गाजणार आहेत. १३ डिसेंबरला लोकसभेचे राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन संपत असल्यामुळे तिथे फ़ारसा गोंधळ संभवत नाही. पण राजकीय धुळवड रंगणार यात शंका नाही. महाराष्ट्राची रास धनु असल्यामुळे महाराष्ट्रात ही धुळवड जरा जास्त रंगेल. केतू हा पोलीस कारवाईचा कारक असल्यामुळे पोलीस कारवाई राजकीय हेतूने होईल याचा परिणाम म्हणुन जनतेचा क्षोभ होईल.

याचा अर्थ २५ २६ डिसेंबरला हे होईल असे नाही. २६ डिसेंबरला गुरुवार आहे. ही कारवाई करण्याचा निर्णय २५ २६ डिसेंबरला होईल. कारवाई कशी करायची याची रुपरेषा ठरेल. अश्या कारवाया शुक्रवारी करण्याची पध्दत आहे. जेणे करुन ज्याला अटक करायची त्याला लगेचच जामिन मिळु नये.

अत्यंत लोकप्रिय नेता अटकेत गेला तर रास्ता रोको, बंद यासारखे पदसाद उमटणारच. खर तर इतकच महाराष्ट्रात घडणे अपेक्षीत आहे. यासोबत ज्यांच्या जन्मकुंडलीत अशुभ योग आहेत अशांच्या बाबतीत काहीना काही घडत असते. अमावस्येच्या आसपास अघटीत घडले तर अमावस्येला बदनाम करण्यात काही अर्थ नसतो.

रवि हा वडीलांचा कारक असतो. तो जेंव्हा केतूच्या युतीत जातो तेंव्हा काही राशीच्या लोकांना वडीलांच्या संदर्भात आजारपण, मानसीक त्रास, किंवा तत्सम वाईट फ़ळे मिळण्याचे योग आहेत. त्याच वेळेस चंद्र हा मातेचा कारक असल्यामुळे मातेसही या घटनेमुळे कष्ट, त्रास, क्लेष होणे स्वाभावीक आहे. अर्थात ज्यांच्या जन्मकुंडलीत  अमावस्या ग्रहणावर जन्म असे योग आहेत त्यांना अशी अशी अशुभ फ़ळे मिळू शकतील.

हे सर्व वाचल्यावर आपल्या लक्षात आले असेल की २५ २६ डिसेंबर २०१९ ला केतूच्या अशुभ योगात रवि चंद्र येत आहेत. त्यामुळे या दिवशी फ़ारसे काही घडेल किंवा घडणार नाही. जनतेला त्रास होणार्या अनपेक्षीत सनसनाटी घटना प्लुटोचा संबंध येताच घडू शकतात. पण २५ २६ डिसेंबरला होणार्या ग्रहयोगात प्लुटोचा किंवा शनिचा अंतर्भाव नाही.


चंद्र प्लुटो युती दर महिन्यालाचा होत असते त्यामुळे या महिन्यात ती झाली तर विशेष नाही. पण खालील काही युती किंवा ग्रहयोग वर्षातून एकदा किंवा त्या पेक्षा जास्त काळाने होत असतात त्यांचा आढावा या निमीत्ताने घेऊ. या युतीचे परिणाम म्हणून काही घटना घडल्या तर त्याच्या अमावस्या आणि सुर्यग्रहणाशी काही संबंध नाही याची नोंद अभ्यासकांनी आणि वाचकांनी घ्यावी असे वाटते.

) मंगळ - हर्षल षडाष्टक योग ( १५० अंश ) जानेवारी २०२० ला होत आहे.
  
या अशुभ योगाचे परिणाम स्फ़ोटक घटना, अपघात या्सारखे असु शकतील.

) शनि युती प्लुटो - ( जानेवारी २०२० ) मोठी स्थित्यंतरे, कष्टकरी समाज, म्हातारी माणसे यांना त्रास होऊ शकेल.

) बुध शनि युती - ( १२ जानेवारी २०२० ) मोठ्या चोरीच्या घटना, संस्थांमध्ये फ़्रॉड होणे इत्यादी. अर्थातच फ़्रॉड लगेचच उघड होत नाहीत.

) बुध प्लुटो युती - ( १२ जानेवारी २०२० )शेअर बाजारात अकस्मात मंदी किंवा तेजी किंवा ट्रेंड बदलणे अश्या घटना दिसतील.

)  रवी शनि युती ( १३ जानेवारी २०२० ) राजकीय नेत्याचा मृत्यु किंवा तुरुंगवास अशी बातमी येऊ शकेल.

) रवि प्लुटॊ युती ( १३ जानेवारी २०२० )  अनपेक्षीत सनसनाटी राजकीय घटना, एखादे सरकार कोसळणे असे घडू शकेल.

या सर्व घटना २५ डिसेंबर २०१९ ते १५ जानेवारी काळात घडतील त्यामुळे अमावस्येला किंवा सुर्यग्रहणात घटना घडतात असे भविष्य वर्तवणार्यांना इतर ग्रहयोगांची दखल घेता किंवा ग्रहयोग सुटे सुटे अभ्यासता सुध्दा जे काय घडले ते अमावस्या सुर्यग्रहणामुळे असे भास त्यांना होऊ शकेल.



3 comments:

  1. अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्ण लेख, पाहू काय घडतंय अमावस्येच्या जवळपास

    ReplyDelete
  2. Your reasoning is scientific Sir.

    ReplyDelete
  3. Your reasoning is scientific Sir.
    Jayant Kulkarni

    ReplyDelete