Showing posts with label Dhanu. Show all posts
Showing posts with label Dhanu. Show all posts

Sunday, January 5, 2020

१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे राशीभविष्य

1. १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मेष ते मिथुन राशीचे राशीभविष्य  https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_46.html


2.  १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे कर्क ते कन्या राशीचे  राशीभविष्य https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_20.html


3. १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे तुळ ते धनु राशीचे राशीभविष्यhttps://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_6.html


4.  १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मकर ते मीन राशीचे राशीभविष्य https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_47.html

Sunday, December 8, 2019

१६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य ( तुळ- वृश्चिक - धनु )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ डिसेंबरला २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २५ डिसेंबरला ला धनु राशीत जाणार आहे.
मंगळ २५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र ८ जानेवारी २०२० ला कुंभ  राशीत जाणार आहे.

धनु राशीत संपुर्ण महिन्यात चंद्र, बुध, रवि या या महिन्यात येणारे ग्रह तसेच आधीपासून धनु राशीतच बसलेले गुरु, शनि, केतू आणि प्लुटो यामुळे धनु राशीत सात ग्रह येतील. २५ डिसेंबर २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर रोजी असलेले कंकणाकृती सुर्यग्रहण या बाबतचा लेख नुकताच प्रसिध्द झाला आहे.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post.html

जानेवारी २०२० पासून नविन वर्ष सुरु होते. यासाठी वार्षिक राशी भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे.

त्याच्या ब्लॉगवर असलेल्या लिंक आणि युट्युब वरच्या लिंक खाली पहा.
https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_54.html  ( मेष ते कन्या रास )

https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_97.html  (  तुळ ते मीन रास )
वार्षिक राशीभविष्य २०२०
मेष -वृषभ- मिथुन https://youtu.be/b97dxZOyD_g
कर्क -सिंह-कन्या https://youtu.be/K32EZmPdVZc
तुळ- वृश्चिक - धनु https://youtu.be/PUCLnZmjx40
मकर-कुंभ-मीन https://youtu.be/ZheFl5O3Xmc

आता राशीनिहाय १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. लग्नरास माहित नसल्यास चंद्रराशीकडून पहावे.

तुळ रास:


आपल्या राशीला चांगले सुखाचे दिवस ८ जानेवारी २०२० पर्यंत आहेत. उत्तम घरचे जेवण आणि सुखाने झोप घेण्याचे योग कमी असतात परंतु आपल्या राशीला काही कारणाने अशी संधी मिळेल. चांगले वाहन सौख्य मिळून जवळचे किंवा लांबचे प्रवास आनंदात होतील. ८ जानेवारी २०२० नंतर मुलांच्या संदर्भात चांगली बातमी समजण्याचे योग येतील किंवा तुम्हाला मुलांचे सुख लाभावे असे मुलांचे वर्तन असेल.

२५ डिसेंबर नंतर व्यापार/व्यवसाय करत असाल तर मोठे यश मिळून अपेक्षे पेक्षा जास्त पैसे मिळतील. व्यवसायात वृध्दी होईल. जवळच्या प्रवासाचे देवदर्शनाचे योग २५ डिसेंबर नंतर येतील. काही जणांना परदेश गमनाचा योग सुध्दा २५ डिसेंबर २०१९ नंतर आहे. एकंदरीत दु:ख व्हावे अशी कोणतीही गोष्ट या महिन्यात अपेक्षीत नाही.

वृश्चिक रास :

अनेक प्रयत्न करुन हुलकावणी देत असलेले कामातले यश २५ डिसेंबर नंतर सहजपणे मिळेल. यासाठी काही गुप्त प्रयत्न करावे लागतील. २५ डिसेंबर नंतर सेव्हींग अकाऊंटला जमा झालेले पैसे कोणत्या मार्गाने गुंतवावे यावर पर्याय शोधून काढावा लागेल. नेहमीच्या नोकरी व्यवसायाशिवाय वारसा हक्काने, लॉटरी ने किंवा अन्य मार्गाने सुध्दा २५ डिसेंबर २०१९ नंतर पैसे येतील. जास्त पगाराची नविन नोकरी सुध्दा या महिनाभरात मिळण्याचे योग संभवतात,

८ जानेवारी २०२० पर्यंत लहान प्रवास चांगले होतील यानंतर मात्र प्रवास होणार नाहीत किंवा पुढे काही दिवस प्रवासाची आवश्यकता भासणार नाही. कदाचीत वर्क फ़्रॉम होम यामुळे किंवा अन्य कारणामुळे असे घडेल. ८ जानेवारी नंतर आपल्या घरात असण्याने काही कटकटी निर्माण होणार नाहीत याबाबत जागरुक असावे अन्यथा आपल्या घरचे लोक आपल्यावर नाराज होतील.

धनु रास:

नुकताच गुरु धनु राशीत गेल्यामुळे सर्वकाही सुखदायी असल्याचा प्रत्यय येत असेल. धनु राशीत होणारे ग्रहण यामुळे काही अप्रिय घटना सोडता हा गुरु एकंदरीत महिना वाईट गेला असे म्हणण्याची वेळ येऊ देणार नाही. या महिन्यात काही विशेष धार्मिक कर्म आपल्या हातून घडेल. पुजेचा मान मिळेल. २७ डिसेंबरला होणारी रवि-गुरु युती अध्यात्म दृष्टीने लाभदायक असेल.  या महिन्यात २५ डिसेंबर नंतर तिर्थयात्रा घडण्याचे योग आहेत.

८ जानेवारी २०२० पर्यंत नोकरी किंवा अन्य मार्गाने बरेच पैसे सेव्हींग अकाउंटला खर्च वजा जाऊन शिल्लक रहातील. यासाठी या महिन्यात यशस्वी व्यापार/ व्यवसाय या मार्गाने आपण उत्तम पैसे मिळवाल. महिन्याच्या शेवटी बुध शनि, प्लुटॊ यामुळे मनाविरुध्द घटना घदतील स्पार्क उडतील पण ते यशस्वी पध्दतीने आपण नक्कीच हाताळाल.

                           --------------

मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html

Thursday, November 7, 2019

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहे
शुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन ५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.

थोडक्यात रवि आणि बुध व शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षल
आणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.

या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( मेष ते कन्या राशी साठी )






















तुळ रास

आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबर पासून धनु राशीत जाणार आहे. २४ तारखेला शुक्र गुरु यांची युती आहे. तिसर्या स्थानी होणारी देवगुरु आणि राक्षसगुरु यांची युती आपल्याला आपल्या लेखनामुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने प्रसिध्दी मिळण्याचे योग आहेत. एका बाजूला प्रसिध्दी योग असताना दुसर्या बाजूला लेखनावर टीका सुध्दा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काय उत्तर द्यायचे याची तयारी झालेली असावी.

११ डिसेंबरला होणारी शुक्र शनि युती शिक्षण क्षेत्रात काम करणार्या लोकांच्या साठी किंवा कमर्शियल आर्ट मधे पेन्सील वर्क, ब्लॅक मेटल वर काम करणार्या लोकांना काही संधी घेऊन येणारी आहे. ही युती म्हणजे मोठा राजयोग आहे. यामुळे तुळ राशीच्या काही लोकांना संधी उपलब्ध होतील. १३ डिसेंबरला होणारी शुक्र प्लुटो युती मात्र जननिंदा घेऊन येणारी आहे. एकाबाजूला सन्मान, संधी तर दुसर्या बाजूला जननिंदा असे विचीत्र ग्रहमान या महिन्यात काही तुळ लग्नाच्या लोकांना अनुभवास येईल.

वृश्चिक रास

आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर वृश्चिक राशीत असणार आहे. आपला एखाद्या गोष्टीचा नको तेव्हडा आग्रह आपल्याला अडचणीत तर आणत नाही ना या कडे लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्यात आपल्याला वैवाहीक जोडीदाराच्या माध्यमातुन काही धनलाभ होण्याचे योग आहेत. काही वृश्चिक लग्नराशींच्या लोकांना पुर्वी झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई सुध्दा मिळेल असे योग आहेत.

या महिन्यात आपल्या घरी कौटुबीक स्नेह संमेलन भरेल. सर्वच स्नेही गोड बोलतातच असे नाही. आपल्याच घरी येऊन, जेऊन खाऊन आपल्याला वाईट बोलून जाणारे स्नेही या महिन्यात असा स्नेह मेळावा झाल्यास दिसतील. हा त्यांचा स्वभाव आहे असे समजून त्या कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कारण ते काही बोलले म्हणजे ते खरे असते आणि त्यामुळे नुकसान होतेच असे नाही.

धनु रास :

आपल्या राशीचा मालक गुरु जो गेले वर्षभर बाराव्या स्थानी होता तो आता रास बदलून धनु राशीत आल्याने आपण जे काम करता त्यात आपले विचार, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल. अनेकदा ग्रहस्थिती अनुकूल नसल्याने काही घडवून आणणे जमले नसेल तर २७ मार्च २०२० पर्य्ंतचे पुढील पाच महिने आपल्या हाताशी आहेत.

आपल्या राशीत होणारी शुक्र व गुरु युती आपल्याला लाभ देऊन जाणार आहे. हाताखालच्या लोकांनी केलेल्या कामामुळे असे घडत असेल तर मात्र याची जाणीव ठेऊन कृतज्ञता व्यक्त करायला आपण विसरणार नाही हे पहा. कोणा मित्रांच्या संसारातला गृहकलह समोर येईल आणि तो मार्गी लावताना आपले हात पोळणार नाहीत इतके अंतर ठेऊन हे काम करा,

या महिन्यात बाराव्या स्थानी बसलेला मंगळ काही गुप्त चिंता, गुप्त खर्च देईल. हे उघड न करता व्यवस्थित मॅनेज करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल.

मकर रास :

आपल्या राशीचा मालक शनि अजुनही बाराव्या स्थानी आहे. जानेवारीत तो मकर राशीत येणार आहे. आपल्या संतती संदर्भात खास करुन संततीच्या नोकरीच्या ठिकाणी उद्भवलेल्या प्रश्नामुळे काही चिंता लागून राहील. काही खर्च सुध्दा किंवा प्रवास यामुळे या महिन्यात करणे आवश्यक ठरेल.

या महिन्यात लाभ स्थानी असलेला मंगळ आपले उत्पन्न वाढवेल किंवा एखादा उत्पन्नाचा नविन मार्ग मिळवून देईल यामुळे खर्च असला तरी मॅनेज होईल.  आपल्या नोकरीच्या ठिकाणी हाताखालचे व वरिष्ठ सुध्दा आपण अडचणीत असाल तर मोलाचा सल्ला देतील. यामुळे आपण काही कठीण परिस्थिती या महिन्यात आली तरी हाताळू शकाल.

कुंभ रास:

आपल्या राशीला संपुर्ण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिने चांगले जाणार आहेत. अनेक कामे मार्गी लागतील. अनेक प्रकारचे लाभ जसे आपल्या मुदतठेवी वरचे व्याज, गुंतवणूकीपासून फ़ायदा या काळात अपेक्षीत आहेत.

२४ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरु युती मुळे आपले वरिष्ठ काही विशेष लाभ आपल्याला मिळवून देतील. २१ नोव्हेंबरला लाभ स्थानात येणारा शुक्र कुंभ लग्नाला राजयोग कारक असल्यामुळे १३ डिसेंबर पर्यंत प्रॉपर्टी मधून लाभ असो की अन्य अनेक लाभ आपल्या पर्यंत पोचोवणार आहे.

याच काळात २१ नोव्हेंबर नंतर आपल्या बुध्दीमत्तेची चमक दिसणार आहे. आपण बुध्दीबळ खेळत असाल किंवा कौन बनेगा करोडपती सारख्या बुध्दीचे प्रदर्शन करण्याच्या स्पर्धा असतील, आपल्याला लोकप्रियता मिळवून देणार आहे. ४ डिसेंबर २०१९ ला होणारा चंद्र आणि नेपच्युन योग कुंभ राशीच्या लोकांचा मुड घालवणारा असेल. हा एक दिवस सोडला तर कुंभ राशीला हा महिना स्मरणात राहील असाच असेल.

मीन रास :

आपल्या राशीचा मालक दशमस्थानी आल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ होण्यास सुरवात होईल याची चुणूक या महिन्यातच दिसेल. आपल्या नोकरीतले किंवा व्यवसायाचे कार्यक्षेत्र मोठे झाल्यामुळे ह्याचे व्यवस्थापन कसे करायचे या कडे सुरवाती पासून लक्ष द्यावे लागणार आहे. २७ मार्च २०२० पर्यंत कामाचा बोजा वाढत जाणार आहे.

इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारे, भुवैज्ञानीक, बोअर वेल खोदणारे, जमिनीतून बाहेर आलेली रत्ने घडवणारे, विकणारे यांना या महिन्यात प्रचंड काम करावे लागणार आहे. यातून फ़ायदा होणारच आहे हे विसरू नये. जे लोक परदेशस्थ कंपनीची कामे करतात त्यांनाही भरपुर काम मिळणार आहे. एकंदरित मीन लग्नराशीच्या लोकांना आलेली निराश या महिन्यात दुर होऊन प्रगतीचा आलेख उंचावत जाण्यास आता सुरवात होणार आहे. आपल्याला सुध्दा हा महिना स्मरणात राहील असाच असणार आहे.

शुभंभवतु